शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद फुलला- पालकमंत्री प्रा. राम शिंदे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा सर्वाधीक लाभ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्जमाफीमुळे फुललेला आनंद कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचे धोरण नेहमीच सकारात्मक राहिले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात आज संपूर्ण राज्यभर प्रातिनिधीक स्वरुपात बेबाक प्रमाणपत्र वितरण करण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात बेबाक प्रमाणपत्रे प्रदान केली. त्यावेळी ते बोलत होते.

 खासदार दिलीप गांधी, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अनिलकुमार दाबशेडे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी ही कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जिल्ह्यातील 3 लाख 76 हजार 804 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यात सर्वाधीक शेतकरी आपल्या जिल्ह्यातील असल्याने आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले. कोणीही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री आहे.

विविध अडचणींचा सामना करत शेती करणाऱ्या, कर्जबाजारीपणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत राज्य शासनाने कर्जमाफी देऊन दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फुलवण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांचा या राज्य सरकारवर विश्वास आहे. हा विश्वास दृढ करण्याचे काम या निर्णयामुळे झाले आहे, असे प्रा. शिंदे यांनी नमूद केले. दिवाळीच्या सणात थेट लाभ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. यानंतर जे-जे सातबाराधारक शेतकरी आहे, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम, कर्ज पुनर्गठण असे लाभ मिळणार असल्याने सर्वांना काही ना काही लाभ राज्य शासनाच्या या योजनेमुळे मिळणार असल्याचे ते म्हणाले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावर्षी जिल्ह्यातही कधी नव्हे तो तब्बल सरासरीच्या 170 टक्के पाऊस गेल्या 36 वर्षांत प्रथमच पडला. यामुळे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात पाणीसाठा निर्माण झाला. त्याचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे, यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेबाक प्रमाणपत्र प्राप्त झालेले शेतकरी आता रब्बी हंगामाचे कर्ज घेण्यासाठीही प्राप्त ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासन तसेच सहकार विभागाने प्रचंड कष्ट घेतले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी श्री. महाजन, जिल्हा उपनिबंधक दाबशेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन, यासंदर्भात असलेल्या तांत्रिक चुका दुरुस्त करुन शेतकऱ्यांची अद्यावत माहिती राज्य शासनापर्यंत वेळेत पोहोचवली. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम देऊ शकणार असल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी खासदार गांधी यांनीही आपले विचार मांडले. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. बळीराजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या पीकांचा विमा उतरवावा, जेणेकरुन आपत्ती काळात पीकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देणारी ही कर्जमाफी असल्याचे महापौर सौ. कदम यांनी सांगितले तर अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळालेली कर्जमाफी हा मोठा दिलासा असल्याचे आमदार मुरकुटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. महाजन यांनी, आधार नोंदणीसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करुन तसेच तालुकापातळीवर ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या पुढाकारामुळे वेळेत दूर होऊ शकल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी वेळेत पाठविणे शक्य झाल्याचे सांगितले.

यावेळी बेबाक प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी धोंडीराम पालवे यांनी त्यांच्या मनोगतात राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने मी कर्जमुक्त झालो. आता मी थकबाकी कधी ठेवणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. दाबशेडे यांनी गेल्या चार महिन्यात कर्जमाफी संदर्भात राज्य शासनाकडून आलेले आदेश आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

आजच्या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात खालील शेतकऱ्यांना सपत्नीक पालकमंत्री प्रा. शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कर्जमाफी बेबाक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

(नगर तालुका) - मजनुभाई पीर मोहंमद शेख, मधुकर पावलस जाधव (संगमनेर तालुका) - पाटिलबा पर्वत दिघे, चंद्रभान मुरलीधर हासे (अकोले तालुका) - आण्‍णासाहेब मुक्‍ता हंडे, रमाजी केशु भोर (पारनेर तालुका) - मच्छिंद्र सखाराम पठारे, तुकाराम रामचंद्र अलभर (श्रीगोंदा तालुका) - पर्वती शिवराम जामले, संतोष तात्‍या खराडे (कर्जत तालुका ) - संतराम गेणा मोरे, बाजीराव यादव सुर्यवंशी (जामखेड तालुका ) - दत्तात्रय मुरलीधर शेळके, धर्मा बाजीराव लेकुरवाळे (पाथर्डी तालुका ) - धोंडीराम बन्‍सी पालवे, पोपट धोंडीबा कारखिले (शेवगांव तालुका ) - राम भानुदास सोलाट, अंबादास हरीभाऊ चेडे (नेवासा तालुका ) - नामदेव राजाराम निकम, प्रकाश दिनकर करपे (राहुरी तालुका ) - उल्‍हास भाऊसाहेब भवर, रविंद्र श्रीराम लगे (श्रीरामपूर तालुका ) - प्रभाकर दशरथ पेरणे, भिमराज राधाकिस दौंड (राहाता तालुका ) - दिलीप मोहन कापसे, जालिंदर सजन वाणी (कोपरगांव तालुका ) - सुरेश काशिनाथ लांडगे, त्रिंबक गोपाळ रणशुळ.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.