आधुनिक नरकासुरांना मृतांजली वाहून नरकचतुर्दशी साजरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लोकशाहीला मारक ठरणार्‍या टक्केवारीचा भ्रष्टाचार व मतविक्री थांबविण्याच्या जनजागृतीसाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने भ्रष्टाचारी टक्कासूर, मतकोंबाड व मतदार दलालांना मृतांजली वाहून आधुनिक पध्दतीची नरक चतुर्दशी साजरी करण्यात आली. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
परंपरेनुसार नरक चतुर्दशीला नरकासूराला तिलांजली वाहिली जाते. मात्र टक्केवारीचा भ्रष्टाचार करणारे टक्कासुर व मतविक्री करणारे मतकोंबाड आधुनिक युगातील नरकासुर ठरत आहे. त्यांचे प्रतिकात्मक शेणाचे पुतळे बनवून, त्याच्यावर धोत्र्याची फुले, एरंड व कन्हेरची विषारी पाने वाहून मुर्दाबादच्या घोषनांनी मृतांजली वाहण्यात आली. 

हुतात्मा स्मारक येथे समाजविघातक प्रवृत्तींचा निषेध नोंदविण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी अ‍ॅड.कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, ओम कदम, अंबिका नागुल, अशोक भोसले, बाबा शेख, हिराबाई ग्यानप्पा, अनिता कासार, सखुबाई बोरगे, तुकाराम टिमकरे, हिरामल थोरात, शांता खुडे, मिनहाज पठाण, पंढरीनाथ बोरुडे आदि उपस्थित होते. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
सजीव सृष्टीच्या उध्दारासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेले पसायदान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभागृहात आमसभेत लावून, त्याचे अर्थ समजविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. देशा-देशातील अण्वस्त्रांच्या स्पर्धेत तीसरे महायुध्द भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर कोरीया सारखे देश अण्वस्त्रांची चाचणी घेवून, तीसर्‍या महायुध्दाला आवाहन देत आहे. युध्द भडकल्यास संपुर्ण मानवजात नष्ट होणार असून, जगात शांततेचा संदेश या पसायदानातून देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोकशाहीचा मुख्यसुत्रधार मतदार असून, निवडणुकीत मतदार कोंबडी व दारुच्या मोबदल्यात मत विकतात. यामुळे समाजविघातक वोटमाफीया सत्तेत येतात. सुशासन येण्याऐवजी कुशासनाची प्रचिती समाजाला येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारींच्या टक्केवारींमुळे पोखरली जात आहे. 

टक्केवारीमुळे अनेक निकृष्ट दर्जाचे काम होत असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. निवडणुका लोकशाही पध्दतीने पार पाडण्यासाठी व समाजातील टक्केवारीचा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी या नरकासुरांना मृतांजली वाहण्यात आल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.