एस.टी बंदमुळे दिवाळीत गावची वाट बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ऐन दिवाळीमध्ये एसटी कामगारांनी संप सुरू केल्याने चाकरमान्यांसह अनेकांच्या गावाची वाट बंद झाली आहे. अनेकांच्या गावची वाट अचानक बंद झाल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीमध्ये गावाकडे जावुन आपल्या कुटूंबामध्ये दिवाळीचा सण मोठया उत्साहात गोड साजरा करण्याचे स्वप्न मनी बाळगलेल्या अनेकांची दिवाळी एसटी बंदमुळे फुसक्‍या फटाक्‍यां सारखी झाली आहे.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
अनेकांनी आपला बोनस, पगार घेवुन गावाच्या माणसामध्ये कुटूंबात जाण्याची ओड लागली, मात्र एसटी कामगारांच्या संपामुळे गावाकडे जाण्यासाठी एसटीच नाही. राज्य शासन व एसटी कामगार यांच्या वादात सर्वसामान्यांच्या दिवाळीचा दिवा आहे. त्या ठिकाणाहुन लावण्याची वेळ आली आहे. अनेक भावा बहिणीना या एसटीच्या संपामुळे भेटता येणार नाही.

कुटूंबापासुन लांब राहुन काम करणाऱ्यांना आपल्या कुटूंबामध्ये जावुन दिवाळी साजरी करता येणार नाही. सरकार व एसटी कामगारांच्या आडमुठे धोरणाचा फटका सर्वसामान्यांना बसला. सणासुदीच्या काळात एसटी कामगारांनी राज्य सरकारला कोंडीत पकडुन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडत आहेत. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
जनतेच्या उद्रेकामुळे सरकार अडचणीत येवुन काही निर्णय घेईल, अशी कल्पना एसटी कामगारांची असावी. दिवाळीच्या सनामध्ये संपाचे हत्यार उपसुन सामान्यांच्या दिवाळीचा दिवा विजविण्याचे काम सुरू आहे. एसटी कामगारांच्या मागण्या सरकारला मान्य नाही झाल्या तर हा संप सुरू ठेवण्याचा निर्धार एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकायांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील लाखो नागरिक मोठया शहरामध्ये नोकरी, कामा निमित्त बाहेर गावी असतात. जिल्ह्यातून दररोज किमान 842 एसटी बस राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात असतात. जिल्ह्यात 12 स्वतंत्र एसटी आगार आहेत. नगरचे तारकपुर हे आगार सर्वात मोठे आहे. 

या ठिकाणाहुन दररोज 93 गाड्या विविध ठिकाणी धावत असतात. दुसरा क्रमांकचे कोपरगाव आगार आहे. या ठिकणाहुन दररोज 79 गाड्या धावत असतात. या आगाराचा गर्दीच्या काळात प्रतिदिन 8 लाखाच्या पुढे व्यवसाय होतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे सर्व बाजुने नुकसान होत आहे. त्याचबरोबर संबधित आगाराचे आर्थिक नुकसान कर्मचारी व राज्य शासनाच्या निर्णयामुळे होत आहे.

जनतेच्या पैशाच्या जोरावर जनतेला ऐन दिवाळीमध्ये वेठीस धरले जात आहे. एसटीची सेवा हि अति महत्वाची सेवा आहे. गरजेच्या वेळी वाहतुक सेवा बंद पडल्याने अनेकांच्या व्यवसायात अडचण निर्माण झाली आहे. एसटी कामगांराच्या संपामुळे वर्तमानपत्रांचे गठ्ठे प्रत्येक बसस्थानकामध्ये पडुन राहिल्याने देश व राज्यातील घडीमोडीचा अंदाज नागरीकांना आला नाही. 

संपाच्या बातम्या सामान्य नागरीकां पर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक, महिला, अबालवृध्द नेहमीप्रमाणे बसस्थानकाकडे निघाले. तिथे गेल्यानंतर संप असल्याची माहिती मिळाली. संप मिटेल या आशेने काही प्रवाशी बसस्थानकामध्ये ठाण मांडुन बसले तर काहींना परतावे लागले. 

काही प्रवाशांना खाजगी वाहनांच्या मदतीने वाजवी पैसे देवुन प्रवास करावा लागला. दरम्यान अनेक खासगी वाहन धारकांनी प्रवाशींची लुट सुरू केली. एसटी बंद असल्याचा गैरफायदा घेत अव्वाच्यासव्वा पैसे घेवुन प्रवाशांची आर्थिक लुट सुरू केली.

एसटी कामगारांची संघटना कामगारांच्या मागण्यावर ठाम आहे. आपल्यामागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत राज्यातील कोणत्याच आगाराची बस सुरू करणार नाही. असा ठाम निश्‍चिय केला आहे. सरकार कामगारांच्या मागण्यासंदर्भात गेल्या 40 दिवसांपासुन बैठकांवर बैठका घेवुन निर्णयच्या चौकटीत उभे आहे. निश्‍चित निर्णय होत नसल्याने आंदोलन असेच सुरू राहीले तर राज्यातील दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर होईल, यामध्ये सर्वसामान्यांची कोंडी होणार हे नक्की आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.