मनपातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर,ठेकेदाराची उडवाउडवीची उत्तरे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची खोदाई तसेच मूलभूत सुविधा अभावी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे मागील आठवड्यात येथील नागरिकां समवेत युवक काँग्रेस च्यावतीने मनपावर मोर्चा काढून उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांना घेराव घालण्यात आला होता व मुकुंदनगर भागातील सद्यस्थिती पाहण्यास भाग पाडले होते.यावर उपायुक्त चव्हाण यांनी संबंधित भागाची पाहणी करून युवक काँग्रेस पदाधिकारी व येथील नागरिकांना येत्या मंगळवारी (दि १७ ऑक्टोबर ) आयुक्तां समवेत संबंधित विभागातील अधिकारी, ठेकेदार व आपले प्रतिनिधी यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
काल दि १७ ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्त घनशाम मंगळे,प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्तांच्या दालनात बैठक झाली.यावेळी मनपा उपायुक्त राजेंद्र चव्हाण,काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, अल्पसंख्याकांचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना चमडेवाले,बाळासाहेब भुजबळ,युवक अध्यक्ष गौरव ढोणे, सरचिटणीस अज्जूभाई शेख आदींसह मुकुंदनगर भागातील मोहम्मद साहब,महेबूब शेख,मोहसीन शेख,खालिद शेख,असद शेख आदी नागरिक यावेळी बैठकीस उपस्थित होते. यावेळी मुकुंदनगर भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व युवानेते सत्यजीत तांबे यांनी केले.

मुकुंदनगर भागातील संजोग नगर ,विखे पाटील शाळा ते संभा टपरी, आयेशा मस्जिद पर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे, रस्ते दुरुस्थीच्या नावाखाली खोदून ठेवले आहे. वारंवार येथील नागरिकांनी ठेकेदार व प्रशासनाकडे तक्रार करून देखील काम अत्यंत संथ गतीने होत असून नुकतेच काही नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागले असून मनपाचे याकडे लक्षच नसल्याचे यावेळी सत्यजीत तांबे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
सदर कामाचे टेंडर हे २०१५-२०१६ मध्ये निघालेले असतांना हे काम अद्याप पर्यंत पूर्ण झालेच का नाही ? प्रशासनाच्या वतीने कामाच्या देखरेखी साठी पीएमसी समितीची स्थापना केलेली असतांना देखील काम अपूर्ण का आहे? संबंधित ठेकेदार कामात कसूर करत आहे.

शिवाय आत्तापर्यंत त्यांना दोनदा नोटिसा बजावल्या याचे साधे उत्तर देखील ठेकेदारानी न दिल्याने व यावर कुठलीच कारवाई केली नसल्याने पालिकेतील भोंगळ कारभाराचे नागरिकांना दर्शन होत आहे ? पिएमसी ने यावर कुठली कारवाई केली ? ठेकेदार हि उडवा उडवीचे उत्तर देत असतांना ठेकेदार काम करीत नसेल तर ठेकेदार बदलण्याची देखील तसदी पालिकेने घेतलेली नाही या सारखे दुर्दैव नसावे.अशा अनेक प्रश्नांचा पाढाच श्री तांबे यांनी आयुक्तांपुढे मांडला.

सदर रस्त्याचे काम कशाप्रकारे पूर्णत्वास घेऊन जाणार व कधी पर्यंत पूर्ण करून येथील नागरिकांचा त्रास कमी करण्या बरोबरच येथील मूलभूत सोयीसुविधा पूर्व पदावर आणण्यास कोणती पाऊले प्रशासन उचलणार ? यावर आयुक्त व प्रशासन अनुत्तरित असल्याने श्री तांबे यांनी प्रशासनास येत्या ३० ऑक्टोबर चा अल्टिमेटमच दिला.या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे येत्या ३० ऑक्टोबर ला न दिल्यास युवक काँग्रेस व मुकुंदनगर भागातील नागरिक कायदेशीर लढा देण्यास सक्षम असेल असा इशाराच सत्यजीत तांबे यांनी दिला.

बैठकी दरम्यान संबंधित कामाचा ठेकेदार पालिकेतच असतांना आयुक्तांच्या बोलविण्यावर देखील ठेकेदार येत नाही? यावर सत्यजीत तांबे यांनी आश्यर्य व्यक्त केले. त्याचप्रमाणे शहरातील इतर चालू व बंद स्थितीतील कामांचा देखील आढावा श्री तांबे यांनी जाणून घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.