...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दुष्काळग्रस्त अनुदानापोटी शासनाकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला मिळालेले सुमारे ५२ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपये अद्यापही त्यांना देण्यात आलेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज केला असून त्यांनीही कारवाई केली नाहीतर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे अशोक विखे यांनी सांगितले.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
अशोक बॅँकेच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटेही उपस्थित होते. सुरवातीला अशोक विखे यांनी मुळा-प्रवरा संस्थेकडील १७ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या रकमेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता.

त्यानंतर माजी आमदार मुरकुटे समर्थकांनीही शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन लेखा परिक्षकांनी त्यांच्या अहवालात ५२ कोटी रुपयांपैकी ३४ कोटी रुपये सभासदांना दिले असून उर्वरित १७ कोटी रुपये सभासदांना दिले नसल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे निदर्शनास आणून दिले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
त्यानंतर माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळ अनुदानात कोणतीही अफरातफर झाली नसल्याचा खुलासा करत कौटुंबिक वादातून हा आरोप अशोख विखे करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा अशोक विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन कौटुंबिक वादातून आरोप करत असल्याचा मुद्दा खोडून काढला. 

सव्वा लाख सभासदासाठी हा विषय हाती घेतला असून वडिल बाळासाहेब विखे यांच्यानंतर थोराला पुत्र म्हणून सभासद, शेतकऱ्यांची बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. संस्थेची वार्षिक सभा असताना त्याचा अहवालही आपल्याला पाठविण्यात आला नव्हता. 

मुरकुटे यांच्यामुळे अहवाल मिळाला, त्याचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळग्रस्त अनुदानाचे सभासद शेतकऱ्यांना देय असलेले ५२ पैकी १७ कोटी रूपये अद्याप दिले नसल्याचे लक्षात आले. तसेच शेती वीज ग्राहकांना शासनाने मंजूर केलेली इंधन व इतर समायोजन आकारातील सवलतीची ९१ लाख ७० हजार ५१४ रूपये ही रक्कमही सभासदांची बँकेत खाती नसल्याची बतावणी करून वाटप केलेली नसल्याचे डॉ. विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगून मुळाप्रवरात हा आणखी एक घोटाळा असल्याचे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.