एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस.टी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्व बसस्थानकात शुकशुकाट होता. संपात एसटी कामगारांची संघटना विरहित एकजुट दिसून आली. संपामुळे जिल्हाभरातील ११ एसटी डेपोतील साडे सातशे बसेसची थप्पी आगारातंच लागल्याने एस.टी. महामंडळाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे ४ हजार ४०० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. अन्याय सहन होत नाही म्हणून नाईलाजातस्व संप करावा लागत असल्याची भावना एसटी कामगारांनी व्यक्त केली.


---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोगातील वेतनश्रेणी सह सेवा सवलती व विविध भत्ते तसेच अन्य प्रमुख मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. एसटी कामगारांच्या १२ संघटनांपैकी नऊ संघटनांच्या संयुक्­ती समितीने हा संप पुकारला होता. एस.टी. कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने यंदा केवळ अडीच हजार रुपये बोनस देवून कामगारांची बोळवन केल्याचा निषेध कर्मचाऱ्यांनी केला.

संपामुळे मध्यरात्रीपासूनच सर्व बसस्थानकांत शुकशुकाट होता. प्रत्येक आगारात संपात सहभागी होत एसटी कामगार थांबलेले होते. एसटी कामगारांनी वर्गणी करून आगारातील कर्मचाऱ्यांसह बसस्थानकात थांबलेल्या बाहेरगावच्या कर्मचारी बांधवांसाहित बसस्थानकात आलेल्या प्रवाशांनाही दुपारचे जेवण दिले. दररोज सतत येणाऱ्या प्रवाशांमुळे बस स्थानक स्वच्छ ठेवणे जिकीरीचे जाते. मात्र आज संपाचा फायदा घेत सफाई कामगारांनी बसस्थानकांची स्वच्छता केली. त्यामुळे आज सर्व बसस्थानके कधी नव्हे एवढी स्वच्छ दिसत होती.

मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात जाण्यासाठी नागरिकांनी अवैध प्रवासापेक्षा रेल्वेचा वापर केला. संप काळात कोणताही अनुचित प्रकार अथवा प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाकडून मध्यरात्रीपासूनच विशेष काळजी घेण्यात आली. प्रत्येक बस स्थानकांवर अधिकाऱ्यांनी गस्त घालून परिस्थितीची पाहणी केली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
एसटी संप होणार हे अगोरच माहीत असल्याने बस स्थानकांत तुरळक प्रवासी होते. या प्रवाशांनी खाजगी प्रवासी वाहतुकीने प्रवास केला. संपाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता . विभागीय कार्यालया बाहेरील फलकावर कामगार सेनेच्या वतीने संप का नको याचे स्पष्टीकरण दिले होते मात्र एसटी कामगारांची वज्रमूठ संपाच्या भूमिकेवर रात्री उशिरापर्यंत आवळलेलीच होती.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारणे दाखवून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर गदा आणण्यात आली आहे. 

मात्र देशातील इतर राज्यातील परिवहन महामंडळांनी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करुन, सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरु आहे. कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय लागू करुन, इतर प्रलंबीत प्रश्­न सोडविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.