लवकरच आमदार विजय औटीना मंत्रिपदाची संधी मिळणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार विजय औटी यांचे काम राज्यात आदर्श आहे. त्यांच्या कडक स्वभावाची मुख्यमंत्री दखल घेतात. त्यांच्या मंत्रिपदाची संधी जवळ आली आहे, असे सूचक उद्गार पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले.पारनेर तालुक्यातील हंगा येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मत्स्य व दुग्धविकासमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते व आ. विजयराव औटी यांचे अध्यक्षतेखाली तसेच अ.नगर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
हंगा गावात जलस्वराज्य अंतर्गत केटिवेअर बंधारे , गावातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कािँक्रटीकरण, दोन शॉपिंग कॉम्पलेक्सचे उद्घाटन, स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व व्यायामशाळा, जि.प. शाळा खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. तालुका शिवसेना प्रमुख नीलेश लंके यांनी हंगा येथे अनेक विकासकामे केली असून, या कामांसाठी आ. औटी यांच्याकडे निधीची मागणी केल्यानुसार ही कामे औटी मंजूर केली असल्याचे प्रास्ताविकात राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. 

नीलेश लंके यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. जि.प. सदस्या राणीताई लंके यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल मंत्री खोतकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
या वेळी बोलताना खोतकर म्हणाले, ग्रामीण भागात शेतकरी शेतीवर विसंबून राहिल्याने शेतकऱ्यांचा विकास झाला नाही, या भागात शाळांची उभारणी केल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असून पायाभूत सुविधा ग्रामीण भागात निर्माण झाल्या आहेत. लंके यांनी तरुणांसाठी व्यायामशाळेची उभारणी करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. लंके यांचे तरुणांचे संघटन करण्याचे काम जोमाने सुरू असून त्यांनी हंगा गावात विविध विकासकामे केली आहेत. आता त्यांचे सुपा गटात चांगले काम सुरू असल्याचे आ. औटी यांनी सांगितले. 

कार्यक्रमास ग्रामस्थ्य व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रम नियोजनासाठी सरपंच हिराबाई दळवी, उपसरपंच संदीप दळवी, चेअरमन बाबासाहेब साठे, राजेंद्र शिंदे, सेना उपप्रमुख दादा शिंदे, बाबा नवले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ढवळे, भाऊ साठे, संतोष लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंदकांत मोढवे यांनी केले. भाऊसाहेब नगरे यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.