प्रवाशास मारहाण करत १० लाखाला लुटले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-पुणे रोडवरील हॉटेल संदिपजवळ खासगी वाहनातून प्रवाशी वाहतुक करणाऱ्या जीपचालक व जीपमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी जीपमधील प्रवाशास मारहाण करून त्यांच्याकडील १० लाख रूपये बळजबरीने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १५) घडली. 
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अशोक बाबुराव तांदळे (रा. चिखली, बीड, वडवणी, जि. बीड) हे दिवाळी साजरी करण्यासाठी पुणे येथे जात होते. यावेळी त्यांच्याजवळ १० लाख रुपयांची बॅग सोबत होती. नगरमधील बसस्थानक क्रमांक तीन (पुणे स्टॅण्डवर) रात्री साडेदहा वाजता ते पुण्याला जाणाऱ्या एसटीची वाट पाहत थांबले.

त्यावेळेस बस स्टॉपच्या गेटवर एक खासगी वाहतुक करणारी जीप थांबली आणि जीप चालकाने शिवाजीनगर पुणे जाणार असल्याचे सांगितले. जीपमध्ये अगोदरच चार प्रवाशी बसलेले होते. तेव्हा तांदळे हे पुण्याला जाण्या साठी त्या जीपमध्ये बसले. तांदळे जीपमध्ये बसताच जीप कायनेटीक चौकमार्गे पुण्याकडे निघाली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
जीप केडगाव परिसरात जाताच जीपमधील एकाने तोंडाला रुमाल बांधून तांदळे यांसे निकालो असे म्हणून तांदळे यांना हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडील मोबाईल, डायरी, एटीएम कार्ड, खिशातील पाच हजार रुपये हिसकावून घेतले आणि एटीएमचा पीन नंबर मागितला. तांदळे यांनी पीन नंबर देण्यास नकार दिला त्यावर त्यांना पुन्हा मारहाण केली. 

शेवटी तांदळे यांनी एटीएम कार्डचा नंबर दिला तसेच त्यांच्याकडील १० लाख रुपये असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतली आणि केडगाव बायपास कांदा मार्केट रोडने निर्जनस्थळी त्यांना लाथ मारून जीपखाली ढकलून देऊन तेथेच सोडून दिले आणि जीप पुन्हा नगरच्या दिशेने वेगात गेली. 

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तांदळे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.