राजीव राजळे उमदा, लोभस आणि अभ्यासू नेता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लोभस, उमदा, गुणग्राही, अभ्यासू, प्रशासनाची जाण असणारा, साहित्य-कला-क्रीडा रसिक, स्पष्टवक्ता असून मनाला भिडणारा आणि भावणारा नेता म्हणजे राजीव राजळे! आशा शब्दात माजी आमदार राजीव राजळे ऊर्फ राजाभाऊ यांना सहकार सभागृहात आयोजित सभेत आदरांजली अर्पण करीत जिल्हाभारतील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांच्या आठवणी उजाळा दिला. यावेळी श्रोते भावूक झाले होते. राजीव राजळे मित्रमंडळातर्फे या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, उपाध्यक्षा राजश्री घुले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शिवाजीराव नागवडे, नरेंद्र फिरोदिया, महापौर सुरेखा कदम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी आमदार अनिलभैय्या राठोड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, सुजित झावरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी महापौर अभिषेक कळमकर, उबेद शेख, दीप चव्हाण, पांडुरंग खेडकर, डॉ. संजय कळमकर, भानुदास मुरकुटे, जेष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब भारदे यांचे नातू मंदार भारदे, नगरसेवक संजय घुले, डी. एम. कांबळे, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
कुंडलिकराव जगताप यांनाही श्रद्धांजली .
राजीव राजळे यांना श्रद्धांजली वाहताना नुकतेच निधन झालेले कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनाही प्रत्येक मान्यवर वक्­त्यांनी आपल्या भावना व्यक्­त केल्या. कुकडीच्या माळरानावर संघर्ष करीत शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना उभारणारे जिद्दी नेतृत्व आशा शब्दात यशवंतराव गडाख , पालकमंत्री शिंदे, शालिनी विखे पाटील यांच्यासहित सर्वच वक्त्यांनी कुंडलिकरावांच्या आठवणींना उजाळा दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.