भूमिपुत्र शेतकरी संघटना सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज़्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्ज़माफी योज़नेत राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी दिली आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
राज़्य सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, अद्यापही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. तसेच हजारो शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संप करून राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफीची व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. 

राज्य सरकारने शेतकरी संपाची दखल घेत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची एक ऑक्टोबरपर्यंत व नंतर दिवाळीपूर्वी अंमलबजावणी करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ, असे जाहीर केले होते. 

तथापि, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येसदेखील राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने मुख्यमंर्त्यांवर फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

बलिप्रतिपदेच्या औचित्यावर भूमिपुत्र शेतकरी संघटना बळीराजाची पारनेर शहरातून मिरवणूक कढून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी दिली. 
--------------------------------
ADVT -  दैनिक सकाळ चे निवासी संपादक डॉ.बाळ ज. बोठे यांची पुस्तके मिळावा आकर्षक डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर http://fkrt.it/AcbmyTuuuN अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा
-------------------------------------------
या मिरवणुकीसाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील, सचिव किरण वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, तालुकाध्यक्ष सचिन सैद, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गागरे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी गणेश चौधरी, संदीप जाधव, संतोष गागरे, नंदू साळवे, संजयशेठ भोर, विवेक चिकणे, विजय चिकणे, संतोष कोरडे, भाऊसाहेब आडसूळ, रोहिदास खोडदे, गोकुळ ठुबे, संजय भोर, शुभम टेकुडे, संकेत भोर, दत्ता वाडेकर, राजू गागरे, योगेश जाधव, सचिन शेळके, सुदाम कोरडे, रामकृष्ण पवार, मोहन मोढवे, सुनील खोडदे आदी परिश्रम घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.