मोेटारसायकलच्या डिकीतून २ लाख ६५ हजार रुपये लांबवले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील नवीन नगर रोडवर असणाऱ्या लिंक रोड येथे एका शेतकऱ्याच्या मोटारसायकलीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने २ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम लांबवल्याची घटना शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी घडली आहे. घटनेच्या १५ दिवसानंतर रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी गुमन दराडे (वय ४२, रा.नळवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक) याठिकाणी ते दूध संकलन केंद्र चालवतात. शेतकऱ्यांना दूधाचे पैसे द्यायचे, म्हणून ते शुक्रवारी दुपारी दोन वाजता मोेटारसायकलवरून (क्र. एमएच १५ एटी १३५६) शहरातील एका बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते.

बँकेतून २ लाख ६५ हजारांची रक्कम काढून त्यांनी आपल्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये ठेवली होती. त्यानंतर ते मोबाईल दुरुस्त करायचा, म्हणून नविन नगर रोडवरील लिंक रोड याठिकाणी असणाऱ्या एका मोबाईल शॉपीमध्ये गेले होते. 
--------------------------------

ADVT -  दैनिक सकाळ चे निवासी संपादक डॉ.बाळ ज. बोठे यांची पुस्तके मिळावा आकर्षक डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर http://fkrt.it/AcbmyTuuuN अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा
-------------------------------------------
काम आटोपून पुन्हा ते मोटारसायकलीजवळ आले असता त्यांना डिक्कीचे झाकण उघडे दिसले. डिक्कीमध्ये पाहिले असता रक्कम नव्हती. याप्रकरणी शिवाजी दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.