ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या करणार आंदोलनाची घोषणा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची घोषणा करणार आहेत.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अण्णा हजारे तीन वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येत आहे़.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण वेगळे व कृती वेगळी अशी टिकाही अण्णांनी सातत्याने केली असून मोदी यांना देशातील गैरप्रकार थांबवायचेच नाहीत असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही अण्णांनी केला होता़

दरम्यान, सोमवारी महात्मा गांधी जयंती असल्याने अण्णा हजारे दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेणार आहेत़ तेथे दर्शन घेऊन प्रेरणास्थळी चिंतन करतील. त्यानंतर ते लोकपाल व शेतकºयांना वरदान ठरणाºया स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.