भगवानगड आता राजकारणापासून मुक्त झाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याचा योग्य निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला असून, येथून पुढील काळातही त्यांनी तेथेच मेळावा घ्यावा. त्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मात्र यासाठी जो वाद त्यांनी घातला तो टाळला असता तर अधिक बरे झाले असते. अशी प्रतिक्रिया आज भगवानगडाचे महंत नामदेवशात्री यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांची सावरगाव येथील सभा संपल्या नंतर पत्रकारांशी त्यांनी सवांद साधला या वेळी ते बोलत होते.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या विषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, भगवानबाबा व ईश्वराच्या मनात जे होते ते आता घडले आहे. गड आता राजकारणापासून मुक्त झाला आहे. या वादातून आता कायमची मुक्ती मिळाली आहे. येथून पुढील काळात आता गडाची ओळख ही आळंदी,पैठण,पंढरपूर सारखी धार्मिक क्षेत्र म्हणून होणार असून, गडावर कोण व्हीआयपी दर्शनाला आला याची चर्चा होणार नाही.

माझी सुद्धा तीच अपेक्षा होती. ती आता पूर्ण झाली आहे. येथे येणाऱ्यांनी आता भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, मात्र कोणत्या अपेक्षा ठेऊन येऊ नये. भगवानगडाने जे भोगले ते आता बस झाले. येथून पुढे या गादीवर बसणाऱ्या एकही महंताला त्रास होणार नाही. आजच्या सभेत पंकजा ने जे संस्कृत सुभाषित म्हटले त्याचा अर्थ मला चांगला समजतो. मी ३५ वर्ष झाले संस्कृत भाषा चांगली जाणतो. कोणी कृष्णाने सांगितलेला संदेश सांगत असले तरीही आपण मनुष्य आहोत हे लक्षात घ्यावे. सुदर्शन चक्र मी हातात घेतलेले नाही.

या सर्व प्रकरणात तुम्ही बारामतीचे हस्तक असल्याचा आरोप होत आहे. या वर प्रतिक्रिया विचारली असता याचे उत्तर येणार काळ देईल. या वर मला काही बोलायचे नाही असे ते म्हणाले. तर गेल्या किती दिवसापासून तुम्ही पंकजा मुंडेंशी चर्चा केली नाही हे विचारले असता ते सांगता येणार नाही. आम्ही ब्रम्हचारी माणसे असून, कोणाला फोन करण्याचे काम पडत नाही. कोणाचा फोन आला तरच फोन घेण्याचे काम करत असतो. 

येथून पुढे दसरऱ्याच्या दिवशी च्या कार्यक्रमात काही बदल करणार काय असे विचारले असता भगवान बाबा यांनी सकाळी महापूजा, देवदर्शन, सीमोल्लंघन व गुरुपूजा हे कार्यक्रम ठरवून दिले असून, त्यात बदल होणार नाही. ही परंपरा मोडली जाणार नाही. पंकजा मुंडे यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून आष्टी पाटोदा व पाथर्डीची निवड केली, काय असे विचारले असता आपल्याला राजकारणावर काही बोलायचे नसून. गडाच्या कन्येने जो निर्णय घेतला तो योग्य असून, वाद न होता हा निर्णय घेतला असता तर अधिक बरे जाले असते असे ते शेवटी म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.