वीज लाईन टाकण्यासाठीचे उभे खांब काम सुरू असतांनाच झाले आडवे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील भोसे येथे नवीन सबस्टेशन होत असून, या सबस्टेशनच्या माध्यमातून करंजीसाठी स्वतंत्र वीज लाईन टाकण्यासाठी उभे करण्यात आलेले खांब पुढे काम चालू असतांनाच मागे आडवे झाले (पडले )आहेत. त्यामुळे या नवीन लाईनचे काम किती निकृष्ट पद्धतीने सुरू आह. हे या प्रकारावरूण लक्षात येत आहे. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भोसे येथे होत असलेल्या सबस्टेशनच्या रेंगाळलेल्या कामाला पुन्हा एकदा सुरूवात झाल. तरी झटपट कामे उरकून बील काढण्यासाठी ठेकेदार किती निकृष्ट काम करतात.हे यावरून दिसत असल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली आहे. 

तरी या संपूर्ण कामाची चौकशी करून निकृष्ट काम करत असलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी. जेणेकरून ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे भविष्यात या लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू असताना खांब पडले तर होणाऱ्या दुर्घटनेस ठेकेदारास जबाबदार धरण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष नामदेव मुखेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे वीज कंपनीकडे केली आहे. 

वीज कंपनीकडून सतत खांब उभे करणाऱ्या व तारा ओढणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे अनेकवेळा ठेकेदार वीज ग्राहक शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुढे खांब उभे करत असतांनाच मागचे खांब पडू लागले तर या संपूर्ण कामांबाबत आता मनसेने आवाज उठावला आहे व रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.