नगरसेवक मनोज दुलमसह अडीचशे जणांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मध्यरात्री लाऊड स्पीकर सुरु असताना तो बंद केल्याने चिडलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी नगरसेवक मनोज दुलम यांच्यासह सुमारे अडीचशे जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पाईपलाईन रोडवर श्रमिकनगर येथे मध्यरात्री लाऊडस्पीकर सुरु असताना तेथे पोलिस कर्मचारी गिरीश केदार यांनी जावून स्पीकर बंद करण्यास सांगितले असताना, नगरसेवक दुलम याने हुज्जत घातली. यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे फौजदार विशाल सणस यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी गेले.

त्यावेळी कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकर बंद करण्यास नकार देऊन हुज्जत घातली. अरेरावी केली. दरम्यान पोलिस कारवाई करीत असल्याने नगरसेवक दुलम व काही महिलांनी पोलिसांवर विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यावेळी पोलिसांनी काहींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असता मोठा जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला.

जमावाने पोलिसांशी हुज्जत घातली. या संदर्भात फौजदार विशाल सणस यांच्या फिर्यादीवरुन नगरसेवक मनोज दुलम, सागर जेटला, निखिल दगडे,महेश म्यान व काही महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नव्हती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.