भगवान गडावर असणारा गर्दीचा झंझावात बदलला निरव शांततेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवान गडावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी असणारा गर्दीचा झंझावात यावर्षी निरव शांततेत बदलला होता. भाविक येत होते. बाबांच्या समाधीचे दर्शन घेवून लगेच घराकडे परतत होते. मात्र गडावर दिवसभर पस्तीस ते चाळीस हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भगवान गडावर हजारो भाविकांनी शनिवारी संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन शांततेत घेतले. सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गडावर येणारे भाविक दर्शन घेवून लगेच परतत होते. त्यामुळे एवढी गर्दी नसल्याचे दिसत होते. पोलिसांनी गडाच्या चारही बाजूने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने रोखली होती. तेथुन भाविकांना गडावर पायी जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतासाचा वेळ लागत होता.

मेळावा नसतानाही हजारो भाविकांनी गडावर उपस्थीती लावली. भगवान गडावर मेळावा होणार की नाही अशा परस्थीतीत दसऱ्याच्या एक दिवस आधीच, भगवान गडावरचा मेळावा संत भगवानबाबांच्या जन्मगावी सुपे सावरगाव, जिल्हा.बीड येथे घेण्याचे ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांची परंपरा मोडीत निघाली. 

गडाचे महंत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी गडावरुन राजकीय भाषणास बंदीचा घेतलेला निर्णय अखेर खरा ठरला. शनिवारी सकाळी संत भगवान बाबांच्या समाधीचे पुजन महंतांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक विधी यावेळी पार पडले. 

सकाळपासूनच भाविकांनी गडावर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. गडाच्या चारही बाजूचे रस्ते गडापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर अडविले होते. तिथे वाहनतळावर वाहने उभी करुन भाविकांना पायी गडावर चालत जावे लागत होते. 

महिला व लहान मुलांना उन्हात चालत जाण्याचा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी सुरक्षिततेसाठी हे सर्व केले. मात्र त्याचा अतिरेक झाला. भाविक गडावर येवुन दर्शन घेतले की लगेच निघून जात होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.