वाहनाच्या चाकाखाली चिरडून एकजण ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवरील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या चाकाखाली चिरडून एकजण जागीच ठार झाला. भगवान बाबुराव पवार (वय ४४) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर- मनमाड रस्त्यावरील शिर्डीमार्गेची अवजड वाहतूक तळेगाव दिघेमार्गे वळविण्यात आलेली आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास भगवान पवार हे तळेगाव चौफुली परिसरातून पायी चालले होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. वाहनाचे चाक त्यांच्या पोट व छातीवरून गेले.

वाहनाच्या चाकाखाली चिरडून ते जागीच ठार झाले. त्यानंतर अपघातास कारणीभूत वाहन घेऊन चालक पसार झाला. तळेगाव चौफुलीवरील रहीवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत पोलीसांना कळविण्यात आले. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. क्र. ७४/ २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. 

सहायक फौजदार बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहे. मयत भगवान पवार यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.