जिल्ह्यात नंबर १ कोण ? याबाबत आता राजकीय पटलावर दावे-प्रतिदावे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पहिल्यांदाच थेट जनतेतून होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीकडे अख्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी दुपारपर्यंत पार पडली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जिल्ह्यात नंबर १ साठी आता भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांच्या दावा-प्रतिदावा केला जात आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत दिग्ग्जांनी आपापले गड शाबूत ठेवले आहे. मात्र, काही ठिकाणी प्रस्थापितांना चांगलाच दणका बसला आहे.

दरम्यान जिल्ह्यात नंबर १ कोण ? याबाबत आता राजकीय पटलावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राम शिंदे व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला अच्छे दिन मिळाले असल्याचा दावा केला आहे. 

२०४ ग्रामपंचायतीपैकी निम्याहून म्हणजे १०८ जागांवर भाजप समर्थक सरपंच निवडून आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीला अनुक्रमे ५० ते ५५ जागा मिळाला असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

भाजपाचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी खोडून काढला. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा उद्रेक ग्रामपंचायत निवडणुकीत झाला असून राष्ट्रवादीच नंबर १ असल्याचा प्रबळ दावा श्री. घुले यांनी केला आहे.दोन नंबरला कोण असा प्रश्न घुले यांना केला असता त्यांनी भाजपाकडे बोट दाखविले. 

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे हेही मागे राहिले नाहीत. कॉँग्रेसच नंबर १ असल्याचे त्यांनी नमुद केले. तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे नंबर १ असल्याची सरपंचपदाची यादी असून ही यादी आम्ही देऊ शकतो असे छातीठोकपणे सांगितले. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.