Live Updates - ग्रामपंचायत निवडणूक निकाल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल 3 लाख 68 हजार 8 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 82.71 टक्‍के मतदान झाले आहे. स्थानिक निवडणूक आणि जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक या दोन कारणांमुळे मतदान उच्चांकी झाले आहे. आज होणाऱ्या मतमोजणीतून “कुणावर गुलाल, कुणाचे हाल’ याचा निकाल तालुकास्तरावर तालुका निवडणूक अधिकाऱ्यांच्या निगराणीत होणाऱ्या मतमोजणीद्वारे लागणार आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नगर तालुक्यातील सरपंच
1) वाळकी- स्वाती बोठे, 2) नागरदेवळे - सविता पानमळकर, 3) नेप्ती - सुधाकर कदम, ४) कौडगाव - धनंजय खर्से, ५) पिंपळगाव कौडा - सतिष ढवळे, ६) जखणगाव - सविता कर्डिले, ७) सोनेवाडी-चास - स्वाती सुंबे, ८) दहिगाव - मधुकर म्हस्के, ९) वडगाव तांदळी - सविता ठोंबरे, १०) साकत - जाईबाई केदारे, ११) आठवड - राजेंद्र मोरे, १२) सारोळा बद्धी - सचिन लांडगे, १३) मदडगाव - सुनिता शेडाळे, १४) सोनेवाडी (पिला) - मोनिका चांदणे, १५) आगडगाव - मच्छिंद्र कराळे, १६) नांदगाव - सुनिता सरड, १७) टाकळी खातगाव - सुनील नरवडे, १८) राळेगण -निलेश साळवे, १९) खातगाव टाकळी - संगीता कुलट, २०) शेंडी - सिताराम दाणी, २१) कापूरवाडी - संभाजी भगत, २२) सारोळा - भारती कडूस, २३) बाबुर्डी बेंद - अशोक रोकडे, २४) रांजणी - बाळासाहेब चेमटे, २५) नारायणडोह - सविता गायकवाड, २६) पांगरमल- बाप्पूसाहेब आव्हाड, २७) उक्कडगाव - नवनाथ म्हस्के़


श्रीगोंद्यातील सरपंच
बेलवंडी -सुप्रिया पवार, तरडगव्हाण - नवनाथ डोके, घोगरगाव -बाळासाहेब उगले, तांदळी दुमाला -संजय निगडे़

पाथर्डी तालुक्यातील सरपंच
1) कोळसांगवी - वसंत पेटारे, 2) मोहरी - कल्पजीत डोईफोडे, 3) जिरेवाडी - उमाजी पवार, 4) वैजूबाभूळगाव - उज्वला गुंजाळ, 5) कोल्हार - शोभा पालवे, 6) सोनोशी - विष्णू दौंड, 7) वडगांव - रंजना धनवे, 8) कोरडगाव - विष्णु देशमुख, 9) भालगाव - मनोरमा खेडकर, 10) तिसगांव - काशिनाथ पाटील लवांडे़

जामखेड तालुक्यात भाजपचे वर्चस्व
पालकमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापुर, शिऊर या तीनही ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या असून, राजुरी ग्रामपंचायतीत गणेश कोल्हे, रत्नापूर ग्रामपंचायतीत दादासाहेब वारे व शिऊर ग्रामपंचायतीत हणमंत उतेकर हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत़
*जामखेड -  पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापुर, शिऊर या तीनही ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात 

*जामखेड -  राजुरी ग्रामपंचायतीचे गणेश कोल्हे, रत्नापूर ग्रामपंचायत दादासाहेब वारे व शिऊर ग्रामपंचायतीच्या हणमंत उतेकर विजयी . 

*नगर -वाळकीत भाऊसाहेब बोठे यांच्या आघाडीची सत्ता पण ते स्वतः पराभुत, स्वाती बोठे सरपंचपदी विजयी

*नगर -नेप्तीत अरूण होळकर गटाची बाजी

*नगर नागरदेवळयात राम पानमळकर गटाचा विजय

*नगर -आठवड मध्ये माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ गट सरपंचपदात पराभुत.

*नगर -सारोळयात बंडु कडुस गटाचा विजय

*श्रीगोंदा - बेलवंडीत सरपंच पदी सुप्रिया संग्राम पवार विजयी,

*श्रीगोंदा - तरडगव्हान ग्रामपंचायत वर आमदार राहुल जगताप यांचे निर्विवाद वर्चस्व, नवनाथ डोके सरपंच

*श्रीगोंदा - घोगरगाव मध्ये बाळासाहेब उगले विजयी ,आमदार राहुल जगताप यांचे वर्चस्व

*श्रीगोंदा - तांदळी दुमाला मध्ये सरपंच पदी आमदार जगताप यांचे संजय निगडे विजयी

*श्रीगोंदा - बनपिंप्री येथे अरुण काका जगताप यांचे सर्व उमेदवार विजयी

*श्रीगोंदा - चवरसंगावी आणि थिटे सांगवी मध्ये आमदार जगताप गटाचे सरपंच विजयी

*श्रीगोंदा - माठ मधे पाचपुते गटाचे सरपंच

तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण
अकोले-तहसील कार्यालय, संगमनेर-नगर परिषद, बॅडमिंटन हॉल क्रीडा संकुल, कोपरगाव-तहसील कार्यालय सभागृह, श्रीरामपूर-तहसील कार्यालय, राहाता-तहसील कार्यालय, राहुरी तहसील कार्यालय, नेवासा-तहसील कार्यालय नवीन इमारत, नगर-जिल्हा सैनिक लॉन, पारनेर-तहसील कार्यालय, पाथर्डी -तहसील कार्यालय जुनी इमारत, शेवगाव-तहसील कार्यालय, कर्जत-तहसील कार्यालय, जामखेड-तहसील कार्यालय, श्रीगोंदा-तहसील कार्यालय, तालुक्‍याच्या या ठिकाणी दि. 9 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 10 वाजता, तर पारनेर, पाथर्डी येथे 11 वाजता मतमोजणी होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.