माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अमर रहे,अमर रहे, राजीव राजळे अमर रहे, अशी घोषणा देत माजी आमदार राजीव राजळे यांच्या पार्थिवावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये शोकाकूल वातावरणात काल रविवारी (दि.८) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या प्रसंगी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे, पालकमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. संजयदिना पाटील, खा.सदाशिव लोखंडे, खा.दिलीप गांधी, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, अशोक डोणगावकर, आ. शिवाजीराव कर्डिले, आ.बाळासाहेब मुरकुटे, संगीता ठोंबरे, आ.संग्राम जगताप, अमर काळे, आ.विजय औटी, आ.भीमराव धोंडे, आ. वैभव पिचड, आ.डॉ.सुधीर तांबे, माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी आ. शंकरराव गडाख, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी खासदार दादापाटील शेळके, डॉ.सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. प्रताप ढाकणे, माजी आ. साहेबराव दरेकर, बाबासाहेब भोस, अजय फटांगरे, कैलास वाकचौरे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र नागवडे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, रामनाथ राजापुरे, शिवाजी गाडे, नानासाहेब फाटके, बापुसाहेब पाटेकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अकोलकर, ॲड. सुरेश लगड, ॲड. गुलाब राजळे, डॉ.बाबासाहेब राजळे यांच्यासह नगर, बीड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथुन आलेले हजारो महिला व पुरुष उपस्थीत होते.

काल रविवारी दुपारी दोन वाजता कासार पिंपळगाव येथील झोपडी येथुन अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलाने सजवलेल्या रथामधून राजीव राजळे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणामधे चार वाजण्याच्या सुमारास भाऊ राहुल राजळे व पुत्र कृष्णा व कबीर यांनी राजळे यांच्या चितेला अग्नी दिला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेसह मान्यवरांनी माजी आमदार आप्पासाहेब राजळे, आ. मोनिका राजळे व परिवाराचे सांत्वन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.