मतदारांनी पुन्हा भाजप सरकारवर विश्वास दाखविल्याचे सिद्ध - प्रा.भानुदास बेरड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळेच भाजपाला हे मोठे यश मिळाल्याचे बेरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

भाजपा प्रणित मंडळांनी १६४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले होते़ तर ४० ग्रामपंचायतींमध्ये विविध स्थानिक आघाड्यांसह भाजपा निवडणुकीच्या आखााड्यात उरतला होता़ यातील पक्षाने दिलेल्या १६४ पैकी ८३ जागांवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपा पुरस्कृत आघाडीने लढविलेल्या ४० पैकी २५ जागांवरील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत़ 

भाजपाने एकूण १०८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून, मतदारांनी सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे बेरड यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.