अजितदादा कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आणि पालकमंत्री प्रा.राम शिंदेंवर घणाघाती टीका करतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

तालुक्यातील राशीन येथे युवा नेते पै. श्याम कानगुडे यांनी निकाली कुस्त्याचे मैदान भरविले होते. या स्पर्धेस पवार आले होते. तेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांच्या या संकेतामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी वेळ देणार.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी मी यापुढे वेळ देणार आहे. या मतदारसंघाशी माझे वेगळे संबंध जोडले गेले आहेत. ते आणखी चांगले करण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील महिन्यात जामखेड आणि नंतर कर्जतला मेळाव्यासाठी येणार आहे. मतदारसंघाच्या अवस्थेवरुन आता विकासाचा द‍ृष्टीकोन असलेल्या चांगल्या नेत्याची गरज आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------

पालकमंत्र्यांमध्ये धमक दिसत नाही.
विकासकामांसह आवश्यक असलेली धमक पालकमंत्र्यांमध्ये दिसत नाही, हे जनतेचे दुर्दैव आहे.तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार काय, या प्रश्‍नावर, तेच तर सांगत आहे मी, मी येथे वेळ देण्याचा अर्थ काय होतो, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. 

इतका निष्क्रिय पालकमंत्री मी पाहिला नाही.
तात्यासाहेब माने व इतरानी रस्ते खराब आहेत, विकास कामे होत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला. तेव्हा पवार म्हणाले की, माझ्या राजकीय आयुष्यात इतका निष्क्रिय पालकमंत्री मी पाहिला नाही.पालकमंत्र्यांना भरपूर अधिकार असतात. मागील 25 वर्षे मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून येतो. पालकमंत्र्यांनी देखील काय केले? त्यासाठी आता भाजपला पराभूत करावे लागेल. रस्त्यांसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही भेटल्याचे पवार यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.