सुसंवादातून मार्गही निघू शकतोच की...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहराच्या विकास व उन्नतीसाठी सध्या दोन तरूण तळमळीने काम करीत आहेत. भले त्यांच्यात वैचारिक मतभेद असतील किंवा निवडणूक जिंकण्यासाठीच्या अपरिहार्य स्पर्धेतून आलेले डावपेचही असतील. मात्र, शहराच्या विकासाला आकार देण्याबद्दल दोघेही प्रामाणिक धडपड करतायेत हे निश्चित. यातल्या एकाला तीन वर्षांपूर्वी नगरकरांनी भरघोस मतांनी कौल दिलाय, तर एकाला नवखा असुनही मतांचे भरभरून दान दिलेय. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आता विकासाची राजकीय तळमळ असो की, राजकीय कुरघोडीच्या डावांची सर्वपक्षीय अपरिहार्तपोटीची मळमळ असो, सुसंवादातूनच मार्ग निघू शकतो. परंतु, ऐन दिवाळीतच या दोन्ही तरुण पुढा-यांंसह त्यांच्या 'प्रेमळ' कार्यकर्त्यांत सुरू झालेला टिकाटिपण्णीचा डाव निश्चितच नगरच्या भविष्यासाठी भूषणावह नाही. म्हणूनच ऐन दिवाळीत मलाही (अहमदनगर म्हणून) याबद्दल बोलावचं लागतयं...

आमदार श्री. संग्राम (भैय्या) जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील महत्वाचे शीलेदार. तर, आमदारकीच्या स्पर्धेत आपणही असल्याचे वेळोवेळी दाखवून देणारे काँग्रेसच्या युवा ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सत्यजीत (दादा) तांबे. दोघेही समवयस्क असल्याने व राजकीय महत्वाकांक्षेने प्रेरित असल्याने दोघांत वैचारिक व राजकीय संघर्ष होणे अपरिहार्यच आहे. 

परंतु, हा संघर्षही काहीतरी ठोस मुद्यांवरच होणं गरजेचं आहे. नाहीतरी मागील चार दशकांत नगर शहराला अविवेकी राजकारणामुळे मोठा फटका बसलेलाच आहे. त्यामुळेच आताही या दोघांनी किंवा त्यांच्या 'प्रगल्भ' राजकीय कार्यकर्त्यांनीही टिका करताना विवेकाचाच आवाज बुलंद करणं गरजेचं आहे. या दोघांच्याही राजकीय पक्षांचीही ती जबाबदारी आहे. म्हणून यावर व्यक्त होणं आमचंही कर्तव्यच आहे. असं आम्ही समजतो.

नगरकरांन्नो, शुभ दिपावली.
भैय्या व दादांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
नगरकरांन्नो, दादांनी स्टाईलमध्ये तीन वर्षांपूर्वीच्या निकालाचा दाखला देत नगरकरांना विचार करायला भाग पाडणा-या शुभेच्छांचा दिवाळी रतिब घातला. 

उड्डाणपुलाच्या निमित्ताने आपला पाया भक्कम करतानाच त्यांनी मार्मिक शैलीत भैय्यांनाही डिवचलं. तो त्यांचा राजधर्मच आहे. परंतु, यावर व्यक्त होताना काय भाषा वापरायला हवी, याबद्दल नगरकरही भांबावलेले आहेत. दादा नगरी कमी अन् पुणेरी जादा असल्याने त्यांनी मस्त पुणे स्टाईलनं टिका केली. पण ते विसरले की, भले पुण्याजवळचं नगर असेलही. 

पण दोन्हीच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भाषेत जमीन-आस्मानाचे अंतर आहे. 'नगरी बाणा' ही वेगळीच चीज आहे. म्हणूनचं किरकोळ मुद्यांवरही तिथं 'धनुष्यबाण'चं तीसेक वर्ष चालला. पण देशभरातील राजकीय लाटांना त्यांची जागा दाखवत याच नगरने बदलही एकाच झटक्यात स्विकारला. 

पण तरिही नगरकरांना मार्मिकपणे व्यक्त होण्याचा बदल अजुनही अंगवळणी नाही ना पडलेला. म्हणुनचं दादांना प्रत्युत्तर देताना मग 'कमोड'सारखे शब्दही आले. असं झालं की संवादाऐवजी विसंवादात भर पडते. तेच झाल्यानं नगरकरांनाही आता काय होऊन बसलयं हे, असचं वाटायला लागलयं.

भैय्यांनी समंजसपणे यावर 'व्यक्त' होण्याचं कर्तव्य पार पाडलं. पण काही कार्यकर्त्यांनी भैय्यांच्या प्रेमाखातर दादांना 'ट्रोलिंग'नं उत्तरं दिली. देशभरात सुरू असलेला हा निरूद्योगी प्रकार आहे हा 'डर्टी ट्रोलिंग'चा. तोच हत्यार म्हणून आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरकर कार्यकर्ते वापरत आहेत. 

याने सुसंवाद व चर्चेलाच खीळ बसते. बाकी दोघांनीही राजकारण करावे व प्रसंगी टिकाटिपण्णीही करावी. पण त्यातही सुसंवादात्मक मुद्दे हवेत. उगी गुद्यांवर जाण्याची भाषा दोन्ही पक्षांच्या विचारी व प्रगल्भ कार्यकर्त्यांनी टाळावी.

नगरची आधीच वाट लागलीय. त्यात आपले लाडके आमदार भैय्याही दुर्दैवाने विरोधी पक्षाचेच आहेत. त्यामुळे मुंबई सरकारकडून त्यांना सापत्न वागणूकचं मिळतेय. तरीही तीन वर्षांत त्यांनी अधिकाधीक चांगले काम करण्याचाच प्रयत्न केला आहे. तर, दादांनीही पद व सत्ताधारी पक्षात नसताना नगरच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. 

असे दोन्ही तरुण नगरचे भविष्य रंगविण्याची व वास्तवात उतरविण्याची क्षमता ठेऊन आहेत. यापैकी ज्याला कोणाला नगरकर आमदारकीची संधी देतील, त्यांनी तिचे सोनं करावं. नगरकर मतदार विचारी आहेत. ते मोजून-मापूनच मताचे दान पदरात टाकतात. 

त्यामुळेच नगरला प्रगतीवर नेणा-यांना इथे नक्कीच उज्वल भविष्य आहे. बाकी कार्यकर्त्यांनीही कमरेखालची भाषा न वापरता आपल्या नेत्यांची प्रतिमा नगरकरांच्या मनात आहे तशीच शाबीत ठेवण्यासाठी कर्तव्यदक्ष रहावे, हेच मागणे त्यांना दिवाळी भेट म्हणून मागत आहे.

सर्वांना पुन्हा एकदा शुभ दिपावली...
तुमचाच लाडका,
मी अहमदनगर बोलतोय

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.