श्रीरामपूरमध्ये ससाणे-मुरकुटे गटाकडे तीन-तीन ग्रामपंचायती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यंदा प्रथमच सरपंच जनतेतून निवडण्यात येणार असल्याचे मोठी उत्सुकता होती. अनेक ठिकाणी चौरंगी लढती झाल्या. ससाणे व मुरकुटे या पारंपारिक गटांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाड्या करत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. कमालपूरची निवडणूक बिनविरोध होवून मुरकुटे गटाच्या जयश्री शिरसाठ या सरपंचपदी विराजमान झाल्या. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तहसिल कार्यालयात आज पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. प्रांताधिकारी तेजस चव्हाण व तहसिलदार सुभाष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टेबलवर अवघ्या दोन तासांत मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. 

सरपंचपदासाठी सर्वाधिक आठ उमेदवार असलेल्या खंडाळा येथे विखे व ससाणे गटाच्या परिवर्तन मंडळाचे अशोक पवार, उंबरगाव येथे ससाणे-आदिक गटाचे चिमाजी राऊत, माळेवाडी येथे ससाणे व भाजप युतीचे सोपान औताडे, वांगी बुद्रूक येथे मुरकुटे गटाच्या सविता बिडगर व वांगी खुर्द येथे मुरकुटे-पटारे गटाचे काकासाहेब साळे सरपंचपदी निवडून आले. 

खंडाळा वगळता इतर ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. उंबरगाव व माळेवाडी ग्रामपंचायत मुरकुटे गटाकडून ससाणेकडे आली, तर खंडाळ्यात सत्ता आबादित ठेवण्यात ससाणे गटाला यश आले.

खंडाळा येथे झालेल्या तिरंगी लढतीत जनसेवा व विकास महाआघाडीला प्रत्येकी सात जागा मिळाल्या. परिवर्तन मंडळाचा सरपंचासह एक उमेदवार विजयी झाले. उंबरगाव येथे ससाणे व आदिक गटाचे सरपंचासह चार सदस्य निवडून आले. 

विरोधी मुरकुटे गटाला पाच जागा मिळाल्या. माळेवाडी येथे चौरंगी लढत झाली, त्यात काँग्रेस व भाजप युतीला सरपंचपदासह सात जागा मिळाल्या. राष्ट्रवादी व मुरकुटे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली. काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. .

वांगी बुद्रूक येथे सातपैकी सहा उमेदवार बिनविरोध निवडून दिले. सरपंचासह एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मुरकुटे गटाच्या सविता बिडगर व सदस्य प्रयागाबाई कांबळे विजयी झाल्या. वांगी खुर्द येथे मुरकुटे व पटारे गटाचे सरपंचासह पाच सदस्य विजयी झाले. विरोधी ससाणे गटाला दोन जागा मिळाल्या. कमालपूर येथे सरपंचपदासह सातही जागा मुरकुटे गटाने बिनविरोध केल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.