श्रीगोंदा तालुक्यात ७ ठिकाणी जगताप -नागवडे गटाचा झेंडा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या लागलेल्या निकालात अनेक ठिकाणी गड आला पण सिंह गेला तर काही ठिकाणी सिंह आला पण गड गेला अशीच अवस्था झालेली पाहायला मिळाली. या निकालांमध्ये काँग्रेसचे नेते आण्णासाहेब शेलार, भाजपचे नेते बाबासाहेब भोस यांना त्यांच्या ताब्यातील ग्रामपंचायती राखण्यात अपयश आले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

आ. अरूणकाका जगताप यांच्या बनपिंप्री गावात जगताप समर्थक भाऊसाहेब पठारे यांचा अवघ्या ८ मतांनी निसटता विजय झाल्यामुळे जगताप यांना हा एक प्रकारचा धक्काच मानला जातो.निवडणुकी दरम्यान आ. जगताप बनपिंप्रीत तळ ठोकून होते. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना खिंडीत गाठण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले तर पाचपुते यांनी सरपंच पदांसह १३ जागांवर विजय मिळवत आपला गड शाबूत राखला. तर माठ ग्रामपंचायतीमध्ये नागवडे-पाचपुते समर्थक उमेदवार सरपंचपदी निवडून आला आहे.

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून त्यामध्ये तांदळी दुमाला ग्रामपंचायत भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे गेली तर पारगाव ग्रामपंचायत भाजपकडून काँग्रेसकडे गेली. तसेच बेलवंडी ग्रामपंचायत काँग्रेसच्या आण्णा शेलारांकडून भाजपच्या पाचपुते समर्थकांकडे गेली तसेच थिटेसांगवी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. 

घोगरगाव ग्रामपंचायत भाजपच्या बाबासाहेब भोस यांच्या ताब्यातून राष्ट्रवादीकडे गेली तर माठ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागवडे पाचपुते समर्थकांकडे गेली.तांदळी दुमाला ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या अनिता संजय निगडे या 554 मतांनी सरपंच पदीविजयी झाल्या त्यांनी भाजपच्या मंदाबाई बापूसाहेब शेळके यांचा पराभव केला तर पारगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी बबन तुळशीराम बोडखे यांना ५२८ मते मिळून विजय संपादन करत विरोधी आबासाहेब नारायण रेपाळे यांचा पराभव केला. 

तरडगव्हाण ग्रामपंचायतीत नवनाथ भागचंद डोके यांनी १११ मतांनी नेमीचंद मल्हारी राजमुडे, यांचा पराभव केला.चवरसांगवी: जगन्नाथ बापूराव गावडे यांचा अवघ्या ८ मतांनी सरपंचपदी विजय झाला.तर विरोधी गटाचे कानिफ किसन उंदरे यांचा निसटता पराभव झाला. माठ ग्रामपंचायतीत सविता नरसिंग घेगडे यांनी ५७ मते मिळवत विरोधी गटाचे उमेदवार शांताबाई परशराम घेडगे यांचा पराभव केला. थिटे सांगवीत वैजंताबाई देविदास वाळके यांनी अवघ्या ७ मतांनी विरोधी गटाच्या उमेदवार अयोध्या अर्जुन शेळक यांचा पराभव केला. .

आण्णासाहेब शेलार यांची अवस्था गड आला पण सिंह गेला
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. त्यांच्या बेलवंडी ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी ११ उमेदवार निवडून आणन्यात त्यांना यश आले पण सरपंचपदी पाचपुते समर्थक सुप्रिया संग्राम पवार या १६५ मतांनी निवडून आल्या. त्यांनी शेलार समर्थक सुवर्णा संजय साळवे यांचा पराभव केला. त्यामुळे शेलार यांचा मोठा पराभव झाला असून होमग्राऊंडवरच शेलार क्लीन बोल्ड झाले आहेत. 

बाबासाहेब भोस यांना त्यांची सत्ता राखण्यात अपयश
घोगरगाव ग्रामपंचायतीमध्येसुद्धा भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांना त्यांची सत्ता राखण्यात अपयश आले असून त्यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत काढून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यशस्वी झाली आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे जगताप समर्थक उमेदवार बाळासाहेब बापूराव उगले हे ५१५ मतांनी सरपंचपदी विजयी झाले. त्यांनी भोस समर्थक दिलीपराव बाबुराव भोस यांचा पराभव केला. .

बनपिंप्रीतील सरपंचपदाच्या पराभवाची तालुक्यात रंगली चर्चा .
आ. अरुणकाका जगताप, माजी जि.प सदस्य सचिन जगताप यांच्या बनपिंप्री गावात ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सरपंचपदाची जागा रिक्त होती, परंतु सरपंच पदासाठी दोन अर्ज आल्यामुळे याठिकाणी निवडणूक झाली. यामध्ये जगताप समर्थक भाऊसाहेब शाहूराव पठारे यांचा अवघ्या ८ मतांनी निसटता विजय झाला. तेथे नितीन भागचंद पठारे यांनी जगताप समर्थकांना कडवी झुंज देत चांगलाच घाम फोडला. भाऊसाहेब पठारे यांना ५४८ मते मिळाली तर नितिन पठारे यांना ५४० मते मिळाली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पराभवाची चर्चा चांगलीच रंगली होती..

काष्टीत पाचपुतेंनी राखला गड.
सर्वांचे लक्ष लागलेल्या काष्टी ग्रामपंचायतीमध्ये माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी आपला गड शाबूत राखत १३ जागा मिळवल्या तर सरपंचपदी पाचपुते गटाच्या सुलोचना पोपटराव वाघ या ७७२ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी विरोधी गटाच्या मनीषा अंकुश वाघ यांचा पराभव केला तर विरोधी भगवानराव पाचपुते, कैलास पाचपुते, दीपक भोसले, अरुण पाचपुते या सर्व पाचपुते विरोधकांच्या पॅनलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.