शेवगाव तालुक्यात घुले यांच्या गटाने मारली बाजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८ गावचे सरपंचपद पटकावीत माज़ी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या गटाने बाजी मारली असून, दोन ज़ागा दिवंगत माज़ी आमदार राज़ीव राज़ळे गटाला मिळाल्या तर स्थानिक आघाडीने २ गावचे सरपंचपद पटकावले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकात मतदारांनी प्रस्थापितांना जोरदार झटका दिला आहे. पंचायत समितीचे सदस्य कृष्णा ऊर्फ गंगा पायघन यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार आखेगाव ग्रामपंचायतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला, तर घुले गटाचे पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात यांच्या खानापूर गावात सरपंचपदासाठी राज़ळे गटाचा उमेदवार निवडून आला. 

पंचायत समिती सदस्या मीराताई लांडे यांच्या जोहरापूर ग्रामपंचायतीत त्यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार अवघ्या ३७ मतांनी विजयी झाला, तेथे राज़ळे गटाने सदस्याच्या तीन जागा मिळविल्या. तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या व अनेक पुरस्कार मिळालेल्या अमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्यमान सरपंच विजय पोटफोडे यांच्या पत्नी संगीता पोटफोडे यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत १४ मतांनी बाजी मारली.त्यांना नवख्या उमेदवार आशा बाबासाहेब गरड यांनी कडवी झुंज दिली. येथे संगीता पोटफोडे यांना ६०३, तर आशा गरड यांना ५८९ मते मिळाली. 

इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- वंदना नामदेव गरड- १८७, वंदना बाळासाहेब चौधरी- २१८,रुपाली संतोष पोटफोडे - २९७,सपना राम पोटफोडे- १५८,यास्मिन सय्यद - ७२, वाघोली ग्रामपंचायतीत घुले व जनशक्ती मंच अशी युती झाली होती. तेथे राज़ळे गटाचे उमेश भालसिंग यांनी बाजी मारली. 

सरपंचपदासाठी भालसिंग गटाचे बाबासाहेब गाडगे विजयी झाले तसेच राज़ळे गटाचे सहा सदस्य विजयी झाले. येथे श्री. गाडगे यांना ९४२ तर घुले गटाचे गोरक्षनाथ जमधडे वकील यांना ८६४ मते मिळाली.आखेगाव येथे तर मतदारांनी सर्वांना अचंबित करीत सरपंचपदी अपक्ष बाबासाहेब गोरडे यांना मोठया मताधिक्याने विजयी तर केले. 

त्याचबरोबर त्यांच्या आघाडीचे सर्व ११ उमेदवार निवडून दिले. या ठिकाणी उमेदवारांना मिळालेली मते अशी-बाबासाहेब गोरडे ११७०, भगवान काटे -२९३, शंकर काटे -५१५, रामचंद्र झिंजुर्के -३४, अण्णासाहेब ढोबळे - १६, संजय पायघन - ४५१, श्रीकांत शिंदाडे-१९. 

माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांचे गाव असलेल्या दहिगाव ने ग्रामपंचायतीत अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गटाचे उमेदवार सुभाष पवार सरपंचपदी विजयी झाले, त्यांना ३१२५ मते मिळाली, तर राज़ळे गटाचे लक्ष्मण काशीद यांना ४४१ मते मिळाली व अपक्ष बशीर पठाण यांना २५१ मते मिळाली. या ठिकाणी सदस्याच्या घुले गटाच्या १४ जागा बिनविरोध आल्या होत्या. उर्वरित निवडणूक झालेली एक जागाही त्यांचीच आली. 

जोहरापूर येथे सरपंचपदासाठी घुले गटाच्या पं.समिती सदस्या मीराताई लांडे व राज़ळे गटाचे शिवाजी उर्फ गंगा खेडकर यांच्या गटात अत्यंत अटीतटीची लढत झाली.येथे सरपंचपदी घुले गटाचे जालिंदर वाकडे अवघ्या ३७ मतांनी झाले. श्री. वाकडे यांना ६१२ तर राज़ळे गटाचे नितीन जाधव यांना ५७५ मते मिळाली व अपक्ष ताराचंद घुटे यांना ७५ मते मिळाली. या ठिकाणी गंगा खेडकर यांच्या गटाचे ३ सदस्य निवडून आले. सुलतानपूर खुर्द (फलकेवाडी) येथे सरपंचपदी अपक्ष बाळासाहेब मरकड विजयी झाले.त्यांना २६२ मते मिळाली.

प्रभूवाडगाव येथे गंगुबाई रंगनाथ बटुळे विजयी झाल्या. त्यांना ५४१ मते मिळाली, अंजली ज्ञानदेव बटुळे यांना ४१८ व गुलबक्ष सर्जेराव बटुळे यांना २४७ मते मिळाली. रांजणी येथे घुले गटाच्या मनीषा काकासाहेब घुले सरपंचपदी निवडून आल्या. त्यांना ५८२ मते मिळाली. वैशाली पद्माकर घुले यांना २६२, सुवर्णा शरद थोटे यांना ५८ व द्वारका आसाराम नऱ्हे यांना १४५ मते मिळाली. याठिकाणी सदस्य म्हणून घुले गटाचे ८ तर राज़ळे गटाचे आसाराम नऱ्हे एकमेव सदस्य निवडून आले.

भायगाव येथे घुले गटाच्या दोन गटांतच लढत झाली. येथे मुरलीधर दुकळे ६३२ मते घेत सरपंचपदी विजयी झाले तर एकनाथ लांडे यांना ६०१ मते मिळाली. येथे आढाव व लांडे गटाचे ६ सदस्य तर सरपंच दुकळे गटाचे ३ सदस्य विजयी झाले. कुरुडगाव येथे जालिंदर काळे हे ५५४ मते घेत सरपंचपदी निवडून आले. तेथे अशोक औटी यांना ४९७ मते मिळाली. तर खामगाव येथे सरपंचपदी मुजम्मील मन्सूर पटेल २७५ मते मिळवून विजयी झाले. येथे वसीम काझी यांना २१७ व दिगंबर बडधे यांना १५७ मते मिळाली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.