संगमनेरमध्ये थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व, विखे गटाकडे अवघ्या तीन पंचायती!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींपैकी डोळासणे, रणखांब व कर्जुले पठार या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ३५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या ताब्यात ३३ ग्रामपंचायती आल्या असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या ताब्यात अवघ्या तीनच ग्रामपंचायती आल्या आहेत. तसेच घुलेवाडी व धांदरफळ खुर्दचे सरपंचपद अपक्षाकडे गेले असले तरी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आ. थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगमनेर नगरपालिकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुलात सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्वप्रथम घुलेवाडी, गुंजाळवाडी या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. तर सर्वांत शेवटी निमगावजाळी ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरु झाली. यावर्षी जनतेतून सरपंचपद निवडले गेले असल्यामुळे अनेकांच्या त्या पदाकडे नजरा लागल्या होत्या.

घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचे अपक्ष असलेले उमेदवार सोपान रामचंद्र राऊत यांनी ३०८१ मते मिळवत विरोधी आपले सख्खे बंधू शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार बाळासाहेब रामचंद्र राऊत यांचा ६६४ मतांनी पराभव केला. तर गुंजाळवाडी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या गटाच्या वंदना विलास गुंजाळ यांनी ३१३४ मते मिळवून विरोधी सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्या गटाच्या सारिका संदीप गुंजाळ यांचा ५५० मतांनी पराभव केला. साकूर ग्रामपंचायत निवडणुकीत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व साकूरचे सरपंच शंकरराव खेमनर यांच्या पत्नी नंदा शंकर खेमनर यांनी ३६३८ मते मिळवत विरोधी ज्योती खेमनर यांचा २७०४ मतांनी पराभव केला.

धांदरफळ बु. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वदेश उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब देशमाने यांच्या गटाचे भानुदास गंगाधर शेटे यांनी १५३४ मते मिळवत विरोधी अविनाश वलवे यांचा १७५ मतांनी पराभव केला. तळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जि.प.सदस्य प्रभाकर कांदळकर यांचे चिरंजीव बाबासाहेब कांदळकर यांनी २४१० मते मिळवत बाळासाहेब दिघे यांचा ४१९ मतांनी पराभव केला. अंभोरे ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर लहानु खेमनर यांनी १६५७ मते मिळवत विखे गटाच्या संपत गोविंद खेमनर यांचा ५६२ मतांनी पराभव केला. 

निमोण ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप भास्कर देशमुख यांनी १३२९ मते मिळवत अनिल घुगे यांचा १३७ मतांनी पराभव केला. पोखरी हवेली ग्रामपंचायत निवडणुकीत अनिल शंकर गायकवाड यांनी ४७१ मते मिळवत कैलास बाबुराव गायकवाड यांचा ५८ मतांनी पराभव केला. जांभूळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात गटाचे महादू दगडू कुदनर यांनी १०३९ मते मिळवत भाजपचे बुवाजी खेमनर यांचा ३५२ मतांनी पराभव केला. 

जांबुत बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तम पंढरीनाथ बुरके यांनी ५०० मते मिळवत सुरेश मारुती भागवत यांचा १३६ मतांनी पराभव केला. वडझरी बु. ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक बाजीराव गोर्डे यांनी २२८ मते मिळवत संदीप रंगनाथ गोर्डे यांचा अवघ्या ८ मतांनी पराभव केला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.