राहात्यात १० ग्रामपंचायतीवर ना.विखे पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहता तालुक्यात ११ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत साकुरीतील जनसेवा पॅनलच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांची १० वर्षांची सत्ता उलथावून टाकत दंडवते यांच्या परिवर्तन आघाडीने सत्तांतर घडवून आणलेे. राजुरी ग्रामपंचायतीत मतदारांनी अपक्ष उमेदवारास सरपंचपदी विराजमान करून पॅनलवाल्यांना नाकारलेे. लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध करत निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर विजय मिळवत ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाने एकूण १० ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींपैकी लोहगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने ११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सोमवारी (दि. ९) राहाता तालुका प्रशासकीय इमारतीच्या सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला.

सुरुवातीला नांदुर्खी ग्रामपंचायतीची मतमोजणी होवून पहिला निकाल लागला. सर्वात शेवटी साकुरी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. साडेअकरा वाजेपयंर्त सर्व निकाल हाती आले. 

उमेदवारांमध्ये व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये निकालाबाबत प्रचंड अस्वस्थता, तर काहीशी उत्सुकता दिसून येत होती. एकंदरीत निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बहुतांशी ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देत मतदारांनी सत्तांतर व परिवर्तन घडवून आणले. .

विजयी झालेले सरपंच व त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार आणि ग्रामपंचायतचे विजयी सदस्य व पडलेली मते पुढीलप्रमाणे : रांजणखोल - सरपंचपदी चांगदेव अंबादास ढोकचौळे (१४६६), प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल ढोकचौळे (१२६५) यांचा २०१ मतांनी पराभव केला. सदस्य - गोपाळ लांडगे (४२८), अनुराधा मन्तोडे (३९०), राजू गायकवाड (३७६), निर्मला जाधव (३७८), अनिल ढोकचौळे (५३०), मिरा अभंग (५२९), मंदा कुलथे (५३९), मंगल आवारे (३६२), सविता बागूल (३१७), रजिया पठाण (३७१), प्रकाश शिरसाठ (२३१), बाबासाहेब ढोकचौळे (२३१), परवीनबी शेख (१८२). .

न.पा.वाडी सरपंचपदी ज्ञानदेव लक्ष्मण साळुंके (७६५), प्रतिस्पर्धी उमेदवार कोंडीराम तुकाराम साळुंके (५४४) यांचा २२१ मतांनी पराभव केला. सदस्य - अलका कोंडीराम साळुंके (बिनविरोध), राजेंद्र धनवटे (२७७), शारदा धनवटे (२७०), विद्या वहाडणे (२३९), बाळकृष्ण वहाडणे (२००), ललिता गायकवाड (२१८), दत्तात्रय जाधव (३०८), सविता उगले (३०१), योगिता धनवटे (२९१). .

साकुरी सरपंचपदी राजेंद्र भानुदास धनवटे (२५३८), प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक हरिभाऊ रोहोम (२२२२) यांचा ३१६ मतांनी पराभव केला. सदस्य - लताबाई शिरकांडे (बिनविरोध), रंजना दंडवते (बिनविरोध), विक्रांत दंडवते (४२७), सविता लुटे (४२७), रोहिणी दंडवते (४००), सुनील गोसावी (५०४), शिलाबाई बनसोडे (५३२), प्रदिप पोपटराव बनसोडे (५०६), अंकुश भडांगे (५५४), छाया अशोक बनसोडे (४६१), राजेश लुटे (४५४), निकिता रोहोम (४४४), स्वप्नील बावके (५५४), शकुंतला लुटे (४७४), सचिन बनसोडे (४३६) भाऊसाहेब आहेर (४१०), सुनिता बनसोडे (३७९)..

निघोज सरपंचपदी गणेश दिलीप कनगरे (१०६१), प्रतिस्पर्धी उमेदवार बाबासाहेब लक्ष्मण ठोकळ (८४६) यांचा २१५ मतांनी पराभव केला. सदस्य - अभिजित मते (३२५), रत्नमाला गाडेकर (३५७), आशा मते (३६५), पार्वताबाई माळी (२५१), विजय काळे (२८०), दिपाली गाडेकर (२४९), भारत मते (३४८), ज्योती धीवर (३३७), अलका चव्हाण (३२९), सचिन भारसाकळ (२६२), काळे मेघा (२५५)..

सावळविहीर सरपंचपदी रुपाली संतोष आगलावे (२०९६), प्रतिस्पर्धी उमेदवार रुपाली संजय जपे (१६६३) यांचा ४३३ मतांनी पराभव केला. सदस्य - स्वप्नील पारदे (४४४), जिजाबा आगलावे (५१३), संगिता परदेशी (४३४), गणेश कापसे (४९५), पद्माबाई वाघमारे (४४५), जपे मालन (५११), सारिका वाघमारे (४९६), रोहिणी जपे (५४३), सागर पगारे (३५९), नितीन मातेरे (३४१), मथुरा बर्डे (४१६), नितीन आगलावे (३५९), चित्रा गायकवाड (३७२), वृषाली जपे (३९१)..

नांदुर्खी खुर्द सरपंचपदी बापुराव गुलाब वाणी (४८४), प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील दौलतराव वाणी (४५२) यांचा 32 मतांनी पराभव केला. सदस्य - सतीष वाणी (२१२), सुरेखा वाणी (२०६), वसंत वाणी (९९), प्रियंका गोसावी (१०१), सतीष संपत वाणी (१७३), उषा वाणी (१९३), सुजाता वाणी (१८८) .

आडगाव खुर्द सरपंचपदी प्रदिप उत्तमराव गायकवाड (२८८), प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभाकर आनंदराव गायकवाड (१९८) यांचा ९० मतांनी पराभव केला. सदस्य - नागेश्वर काळे (८६), मंगल शेळके (१२८), मंगेश गायकवाड (१२८), दिपाली शेळके (१२४), भारती माळी (१६३), संगिता शेळके (१४२), चंद्रकला शेळके (१४०)..

डोऱ्हाळे सरपंचपदी भाऊसाहेब बाबूराव डांगे (१००१) प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण दत्तात्रय काकड (५३८) यांचा ४६३ मतांनी पराभव केला. सदस्य - शिवाजी डांगे (३०१), मिननाथ हेगडे (३५५), शुभांगी लांडगे (३५३), बाळासाहेब डांगे (३१३), शिलाबाई डांगे (बिनविरोध), स्वप्नाली सरोदे (बिनविरोध ), संदिप जपे (बिनविरोध), कविता डांगे (५६३), मंगल डांगे (५७९)..

नांदुर्खी बु. सरपंचपदी विद्या योगेश चौधरी (१३७४), प्रतिस्पर्धी उमेदवार पद्मा अरूण चौधरी (७१२) यांचा ६६२ मतांनी पराभव केला. सदस्य - दत्तात्रय चौधरी (३९०), पूनम चौधरी (३८९), लिलाबाई दाभाडे (३८९), भास्कर कोळगे (२०३), शितल चौधरी (२०६), मिना चव्हाण (३७४), जालिंधर चौधरी (३६७), सिंधू चौधरी (बिनविरोध), प्रल्हाद चौधरी (३३६), शोभा कुदळे (३८३), मंदा चौधरी (३७४)..

खडकेवाके सरपंचपदी सचिन आण्णासाहेब मुरादे (७४०) प्रतिस्पर्धी उमेदवार गोरक्ष सोन्याबापू मुरादे (६५६) यांचा ८४ मतांनी पराभव केला. सदस्य - जालींदर मुरादे (२६७), वंदना गायकवाड (२४४), प्रियांका मुरादे (२६२), नवनाथ मुजमुले (१६२), सुनिता लावरे (१९४), उषा मुजमुले (१९२), सुनील पोकळे (३३९), सचिन सुरासे (३१२), सुवर्णा यादव (३१२)..

राजुरी सरपंचपदी अपक्ष सुरेश नारायण कसाब (१५२१) प्रतिस्पर्धी उमेदवार सुमन लक्ष्मण गोरे (७७८) यांचा ७४३ मतांनी पराभव केला आहे. सर्व सदस्य बिनविरोध - मंदाकिनी कदम, सिमा कदम, सुधाकर गोरे, सुनिता आहेर, मधुकर भालेराव, आरती गोरे, मंदाकिनी गोरे, अर्जून कदम, भाऊसाहेब गोरे, अनिता दळे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.