पाथर्डीत पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिगत प्रतिमेला महत्व.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. तालुक्यातील अकरा ग्रामंचायतींच्या संरपच व सदस्य निवडीच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिगत प्रतिमेला महत्व दिले आहे. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तिसगावमधे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांनी गेल्या चाळीस वर्षांची सत्ता कायम राखली. कोल्हारमधे माजी सभापती संभाजी पालवे यांनी सत्ता मिळविली.भालगावात भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी एकहाती सत्ता खेचली आहे.कोरडगावमधे सत्ता परीवर्तन झाले. मोहरीत कल्पजित डोईफोडे यांनी गड राखला. निवडुंगा येथे सत्ता परिवर्तन होऊन विद्यमान सरपंचांना पराभव पत्करावा लागला.

निवडुंगा यामध्ये गावात एकाच प्रभागातून सुनंदा मरकड व संदीप मरकड ह मायलेक निवडून आले. शोभा केलते सरपंच झाल्या तर विद्यमान सरपंच सविता ससे पराभूत झाल्या. तिसगावकरांनी ज्येष्ठनेत काशिनाथ पाटील लवांडे यांना मोठया मताधिक्याने सरपंचपदी बसविले. मात्र, त्यांच्या पॅनलच्या सात जागा आल्या तर विरोधी भाऊसाहेब लोखंडे व बाळासाहेब लवांडे यांच्या पॅनलच्या दहा जागा निवडून आल्या.वडगावमध्ये सरपंच आदिनाथ बडे यांचा उद्धव नागरगोजे यांनी पराभव केला. 
नागरगोजे यांच्या ताब्यात पंचायात आली आहे. 

कोरडगावमध्ये सत्तांतर झाले. येथे मस्के गटाचा पराभव झाला तर विष्णू देशमुख सरपंच झाले. नारायण काकडे,मधुकर देशमुख, नारायण मुखेकर यांच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. भालगावमधे मनोरमा खेडकर सरपंच झाल्या. अकुंश कासुळे व बापुराव कासुळे या दोन भावांचा पराभव खेडकर यांनी केला. वैजुबाभुळगाव येथे रावसाहेब गुंजाळ यांचा पॅनल विजयी झाला.स्वाती घोरपडे यांचा पराभव झाला. 

कोळसागंवी येथे म्हसोबा पॅनलला विजय मिळाला. भाऊसाहेब घुले, युवराज फुंदे, शरद घुले, जगन्नाथ कुसळकर यांच्या पॅनलचा विजय झाला. मोहरी गावात कल्पजीत डोईफोडे यांनी विजय मिळविला व बहुमतही मिळविले. संजय नरोटे यांना पराभव पत्करावा लागला. कोल्हारमध्ये संभाजी पालवे यांच्या पॅनलचे सरपंचासह आठ सदस्य निवडून आले. 

विरोधी मोहन पालवे यांच्या पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. सोनोशी गावत विष्णू दौंड ठरल्याप्रमाणे सरपंच झाले. सुनंदा काकडे सदस्य झाल्या. जिरेवाडीत भाऊबाबा पॅनलचा विजय झाला. भीमराव आंधळे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे पॅनलचा पराभव झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.