पारनेरमध्ये शिवसेनेचेच वर्चस्व अंतर्गत गटबाजीत राष्ट्रवादीची वाताहत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यात 16 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेने वर्चस्व राखले असून, राष्ट्रवादीची मात्र वाताहत झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय समाज़ पक्षाने तालुक्यात शिरकाव केला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातून प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ढवळपुरी,भाळवणी ,वनकुटे,पळशी या मोठया ग्रामंपचायती हातातून गेल्या असून, याला राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत ठरली आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

दरम्यान, तालुक्यात सभापती राहुल झावरे,प्रशांत गायकवाड,बाबासाहेब तांबे, नामदेव ठाणगे,बंडू रोहोकले,अप्पासाहेब शिंदे यांनी आपले गड कायम राखले तर रासपने कोहोकडीत प्रवेश करून तालुक्याच्या राजकारणात शिरकाव केला. भाजपाला एकही जागा निवडून आणता आली नाही. 

तालुक्यात सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये आमदार औटी-सेना सात, सुजित झावरे-प्रशांत गायकवाड यांच्या गटाला चार, सभापती राहुल झावरे यांच्या गडाला -दोन तर सेनेबरोबर एक, रासप एक अशा ग्रामपंचायती पक्षनिहाय ताब्यात आल्या आहेत. 

ऐन ग्रामपंचाायत निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीचे युवा नेते पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, अशोक सावंत यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीचे युवा नेते सुजित झावरे यांच्याविरोधात बंड पुकारले. तसेच भाळवणीत राष्ट्रवादीचे बबलू रोहोकले व बाबाजी तरटे ,ढवळपुरीत डॉ. राजेश भनगडे व बबन पवार यांच्यात गटबाजी झाली. व त्यांनी स्वंतत्रपणे निवडणूक लढवली. येथील गटबाजाी सुजित झावरे थोपवू शकले नाहीत.राष्ट्रवादीच्या गटबाजीचा फायदा भाळवणीत सेनेचे विकास रोहोकले यांनी उचलला व स्वत:च्या मातोश्री लीलाबाई रोहोकले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीसह इतर सर्व जागा निवडून आणल्या.

ढवळपुरीत डॉ.सईद काझी यांनी मोहन टकले या स्वत:च्या संस्थेत शिक्षक असणाऱ्या उमेदवाराला उभे करून धनगर जातीचे कार्ड वापरण्याचा प्रयत्न सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांना हाताशी धरून केला. मात्र, काझी यांचा हा डाव सभापती राहुल झावरे यांनी ओळखून डॉ. भगनडे यांच्यासाठी सेनेचे आमदार औटी यांच्याबरोबर झावरे यांचीही खेळी यशस्वी ठरताना डॉ. भनगडे हे सरपंच झाले व सर्व जागाही निवडून आल्या. येथे सईद काझी यांच्या खेळी अयश्वी ठरून राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. 

गोरेगावमध्ये कृषीचे माजी सभापती बाबसाहेब तांबे यांनी गावावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. त्यांनी आपल्या पत्नीला सरपंच पदाच्या निवडून आणून सर्व जागांवर एकतर्फी विजय मिळवला. सरपंचपदाचे विरोधी उमेदवार अभयसिंह नांगरे या युवा नेतृत्वाला त्यांचे नेते गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांच्यावर गावात असलेल्या नाराजीचा फटका बसला. 

पानमंद यांच्या संस्थेच्या उपाध्यक्षांसह अनेक संचालक व सेवका निवडणुकीपासून दूर होते. पानमंद यांच्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही पराभव पत्करावा लागला, ही पानमंद यांच्यावरील नाराजी दिसून येते. 

सभापती झावरे यांचे भोंद्रे ,करंदी येथे तर नामदेव ठाणगे व सिध्देशरवाडी येथे युवराज गुंजाळ यांनी स्वत:चे नेतृत्व सिध्द केले.पळशी,वनकुटे भागात आमदार विजय आौटी यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामांचा फायदा अप्पासाहेब शिंदे व राहुल झावरे यांना झाला. 

राहुल झावरे यांच्या गळयात सरपंचपदाची माळ पडली. हत्तलखिंडीत सभापती प्रशांत गायकवाड ,चोंभूतमध्ये गंगाधर शेळके,अंकुश म्हस्के यांचे वर्चस्व कायम आहे. पुणेवाडीत युवा नेतृत्व बाळासाहेब रेपाळे यांच्या गळयात ग्रामस्थांनी सरपंचपदाची माळ टाकली. इतर जागा मारूती रेपाळे यांच्या पारडयात टाकल्या. कोहोकडीत रासपचे साहेबराव पानगे यांनी विजय मिळवत सेना,राष्ट्रवादीला धक्का दिला. एकूणच नव्या पॅटर्नमध्ये युवकांना गावच्या राजकारणात ग्रामस्थांनी संधी दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.