कर्जतमध्ये पालकमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मारली बाजी .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात ८ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली. भाजपचे ५, काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सरंपच विजयी झाला आहे; मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे ४ सरंपच निवडून आल्याचा दावा केला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागले. बहिरोबावाडी, म्हाळंगी, निंबे, कौडाणे, मुळेवाडी यांचा समावेश आहे. अळसुदे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग १ मध्ये कविता गाडे व माधवी गाडे यांना समान ३३४ मते मिळाली असता चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये माधवी गाडे यांचा विजय झाला 

कोपर्डी ग्रामपंचायतीत सत्तापरीर्वतन 
राज्यामध्ये गाजलेल्या कोपर्डी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते या ठिकाणी सत्तापरीर्वतन झाले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड व महेंद्र गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी सुद्रिक यांनी बाजी मारली. या विजयामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आस्तित्व कसे बसे टिकले आहे. 

अळसुंदे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका मीनाक्षी सांळुके व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांच्याविरोधात पालकमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी ताकद पणाली लावली होती; मात्र, तरीही बाळासाहेब सांळुके यांच्या नेतृत्वाखाली येथे त्यांच्या गटाने बाजी मारली व एक सामान्या कुटुंबातील व्यक्तीस सरंपच म्हणून निवडून आणले.

 बहिरोबावाडी ग्रामपंचयतीत विजय तोरडमल या युवा नेत्याने शिवसेनेच ज्येष्ठ नेते बळीराम यादव यांचा पराभव केला. हा मोठा धक्कादायक निकाल येथे नोंदवला गेला. भाजपचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी सर्व विजयी उमेदवरांचे अभिनंदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.