जामखेडमध्ये पालकमंत्री ना. शिंदे एक्सप्रेस सुसाट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील राजकीयदृष्या महत्त्वाची मानले जाणारी रत्नापूर, शिऊर, राजुरी या तीन ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तिन्ही ग्रामपंचायतवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शिऊरच्या सरपंचदासाठी हनुमान अंकुश उतेकर हे (११४५) मतांनी विजयी झाले आहेत. तर प्रतिस्पिर्धी अमोल काळे यांना (८५८) मते मिळाली आहेत.

राजुरीच्या सरपंचपदी गणेश श्रीराम कोल्हे हे (९४७) मते मिळवून विजयी झाले आहेत. तर माजी सरपंच सौ काळदाते यांचे पती काळदाते सुभाष श्रीपती (५१७) व आंबेडकर गोविंद लक्ष्मण यांना (७६) मते मिळाली आहेत. रत्नापूरच्या सरपंचदासाठी दादासाहेब माधव वारे (९२५) मते मिळाली आहेत. तर वारे दिगांबर माधव यांना (६९७) व कदम गोपाळा बाळासाहेब यांना (१०१) मते, पवार श्रीकांत रामचंद्र यांना (३०) तर वारे राजेंद्र प्रभाकर यांचा (२४) मतांनी पराभव झाला आहे. .

रत्नापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक महारनवर शाहजी ज्ञानदेव, माशीमबी बाबुखा, शेख रसूल रहिम यापूर्वीच बिनविरोध झाले आहे.

प्रभाग क्र.२ : अशोक दगडु ढमडेरे (३३३ विजयी) ढवळे बबन आत्माराम ( ३१९ पराभूत), सारिका शरद मोरे राजश्री (३६१ विजयी), वारे तेजस्विनी संतोष (२९१ पराभूत), जगताप राजश्री धनराज (३३४ विजयी), कदम संजीवनी विजय (३१० पराभूत).

प्रभाग क्र.तीन : सुजित बाबूराव नलवडे (३३० विजयी), वारे दत्तात्रय लक्ष्मण (३१३ पराभूत), रतन गोरख राजगुरू (३२२ विजयी), जाधव राणी लक्ष्मण (३१७ पराभूत),संगीता लालासाहेब ढवळे (३३२ विजयी), ढवळे मोहीनी पांडुरंग (३०९ पराभूत),भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या सर्व जागा विजय झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही.

राजुरी ग्रामपंचायत सदस्य प्रभाग क्र.एक : कोल्हे मच्छिंद्र युवराज (३५८ विजयी), मोरे राजू बापू (१६८ पराभूत),आंबेडकर समाधान सीताराम (६६ पराभूत).

प्रभाग क्र.एक: सदाफुले संगीता सुनील (३७२ विजयी), शिंदे शकुंतला ज्ञानदेव (२१५ पराभूत) कोल्हे संजीवनी बबन (४३० विजयी),राऊत मिनाक्षी रामभाऊ (१५०पराभूत).

प्रभाग क्र.दोन: घुले बाबासाहेब रामदास (१८४ विजयी), खाडे आत्माराम सीताराम (१६४ विजयी), खाडे संजय गोरख (१५८ पराभूत), घुले किरण भास्कर (१०९पराभूत) घुले शाहदेव साधू (४९ पराभूत), डोळे अभिमान अर्जुन (१४९ पराभूत).

प्रभाग तीन: खाडे कूसुम रामदास (२३७ विजयी), घुले सिंधूबाई भीमराव (१६३ पराभूत).

शिऊर ग्रामपंचायत प्रभाग एक : अहिल्याबाई देवकाते बिनविरोध निवडून आल्या आहेत.आकाश अभिमान निकम (३१२ विजयी) भाऊसाहेब रघुनाथ तनपुरे (३०३ पराभूत) अजिनाथ बन्सी निकम (२२१ पराभूत), रंजना अंकुश तनपुरे (५२६ विजयी) तर सुनीता महादेव तनपुरे (३०५ पराभूत).

प्रभाग क्र 2: पिपरे भाऊ बारीकराव (५११विजयी) फाळके शेवक शाहजी (४४७ विजयी), चव्हाण राजू भाऊ (१९२ पराभूत) .

प्रभाग तीन : निकम गयाबाई मच्छिंद्र (३२४ विजयी), इंगोले जयश्री रोकडनाथ (२७२ पराभूत). प्रभाग क्रमांक ३ मधून समुद्र प्रिया भगवान या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

माने बापूसाहेब प्रल्हाद (३२५ विजयी) तर क्षीरसागर अनिल सुखदेव (२५१ पराभूत). लटके स्वाती सिध्देश्वर (४०६ विजयी), पाटील सुनीता विश्वास (१७४ पराभूत).

जामखेड तालुक्यातील तिन्ही गावच्या ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेने विश्वास टाकून सर्व सरपंच हे भाजपाचे बहुमताने निवडून दिले. आता ना.शिंदेना या गावाचा विकास करण्याचे आव्हान आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.