अकोल्यात ७ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे; भाजपकडे ४ तर सेनेकडे २

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिळवंडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून उर्वरीत १० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. ७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने झेंडा फडकावला असून भाजपानेही ४ तर शिवसेनेने २ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याचे सांगितले असून यामध्ये शिळवंडी, मुरशेत, आंभोळ, लहित खुर्द, सोमलवाडी, डोंगरगावचा समावेश असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले.

तर भाजपाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे म्हणाले की, शेंडी, गुहिरे, वाकी, मुरशेत ग्रा.प. भाजपाच्या ताब्यात आल्या असून ३९ सदस्य हे भाजपाचे आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ म्हणाले की, चास व लहित खुर्द ग्रा.पं.वर सेनेचे वर्चस्व सिध्द झाले असून २८ सदस्य सेनेचे आहेत.

अकोले तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. शिळवंडी ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली. यामध्ये सरपंचपदासाठी यहादू शिवराम साबळे हे बिनविरोध निवडून आले, तर सदस्य म्हणून निलेश श्रावणा साबळे, आशा देवराम बांडे, नंदा सखाराम साबळे, कृष्णा रामदास साबळे, दिपक वसंत साबळे हे बिनविरोध निवडून आले तर २ जागा रिक्त आहेत. उर्वरीत १० ग्रा.पं.साठी मतदान झाले. यामध्ये सोमलवाडीच्या सरपंचपदी नामदेव सखाराम सारोक्ते विजयी झाले असून सदस्य म्हणून प्रभाकर भाऊ सारोक्ते, चंद्रभागा रुपाजी कचरे, अंकुश निवृत्ती गोडे, रंजना श्रावणा गंभिरे, बुधाबाई पांडुरंग गंभिरे हे बिनविरोध निवडून आले तर २ जागा रिक्त आहे.

ग्रा.प.मुरशेत : साळुबाई ठका उभे या विजयी झाल्या असून प्रभाग क्र.१ मधुनही त्या बिनविरोध निवडून आल्या, तसेच अशोक सोमा गोलवड बिनविरोध निवडून आले तर ५ ग्रा.पं.सदस्यांच्या जागा रिक्त आहेत.

ग्रा.पं.वाकी : सिमा राम सगभोर या सरपंचपदासाठी विजयी झाल्या. तर सदस्य म्हणून सुशिला श्रावणा झोले, भाऊराव मारुती सगभोर, धिरेंद्र दत्तात्रय सगभोर हे प्रभाग २ व ३ मधून तर मालती धिरेंद्र सगभोर हे सर्व बिनविरोध निवडून आलेत. तर २ जागा रिक्त आहेत.

ग्रा.पं.भंडारदरा : पांडुरंग आनंदा खाडे हे सरपंचपदी विजयी झालेत. तर यशवंत काळू खाडे, मंगला विठ्ठल खाडे, भामाबाई त्रिंबक खाडे, गणपत मुरलीधर खाडे, माधुरी भास्कर खाडे, रामदास पांडुरंग देशमुख, लिलाबाई दौलत खाडे हे बिनविरोध निवडून आले. तर दोन जागा रिक्त आहेत.

ग्रा.पं.गुहिरे : चंद्राबाई एकनाथ सोनवणे या सरपंचपदी विजयी झाल्या असून सदस्य म्हणून राजु पुंजाजी कातडे, बारसाबाई अनिल सारुक्ते, मंगल सुनिल सारुक्ते, चंद्राबाई एकनाथ सोनवणे हे बिनविरोध निवडून आले. तर ३ जागा रिक्त आहेत.

ग्रा.पं.शेंडी : दिलीप यशवंत भांगरे हे विजयी झाले तर ग्रा.पं.सदस्य म्हणून दत्तू चंदर भांगरे, सुरेश रामदास घाटकर, देवराम मंगळा भांगरे, सिताबाई गोगा भांगरे, रामनाथ दिनकर खाडे, मालती एकनाथ भांगरे हे बिनविरोध निवडून आले तर २ जागा रिक्त आहे.

ग्रा.पं.डोंगरगाव : बाळासाहेब उगले हे विजयी झाले. तर देवराम आगविले, संतोष कदम, संगिता उगले, अनिता मेंगाळ, अश्विनी उगले, योगिता उगले, भारती उगले, रामदास उगले, संतोष सरोदे, कविता उगले, अशोक उगले निवडून आले.

ग्रा.पं.आंभोळ : सरपंचपदी कोंडीबा भागाजी वाजे हे विजयी झाले तर सुनिता सुनिल चौधरी, सोमनाथ काशिनाथ तिटकरे हे बिनविरोध निवडून आले तर चेतन सुभाष साबळे, नामदेव गोपाळा साबळे, अलका बाळासाहेब शेवंते, दत्तात्रय रंगनाथ साबळे, मंदा गोरक्ष चौधरी हे विजयी झाले.

ग्रा.प.लहित बुद्रुक : सरपंचपदासाठी अर्जुन दत्तु गावडे हे विजयी झाले तर ग्रा.प.सदस्य म्हणून राम संपत गोडसे, सोनाली ज्ञानेश्वर जाधव, आशाबाई संदीप गोडसे बिनविरोध झाले. तर किशोर रोहिदास गोडसे, सुमन भाऊसाहेब कडाळे, मिराबाई रामदास गोडसे, संतोष हरिभाऊ माळी, विशाखा संतोष धुमाळ, राहुल रमेश गोडसे हे विजयी झाले आहेत.

ग्रा.प.चास : सरपंचपदासाठी बाळासाहेब रामभाऊ शेळके विजयी झाले. सदस्य म्हणून कल्पना विष्णू घोडे बिनविरोध झाले तर बाळासाहेब महादू शेळके, सुनिता रावसाहेब शेळके, लिलाबाई बाळासाहेब शेळके, निलेश तबाजी दुरगुडे, बाळासाहेब सावळेराम शेळके, मिरा गोरक्ष कहाणे, राजाराम शेळके, सुनिता अंकुश शेळके हे विजयी झाले आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.