नगर तालुक्यातील दिग्गजांना राजकीय धक्का.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील २८ पैकी २७ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. बहुतांश ठिकाणी दिग्गजांना राजकीय धक्का बसला. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड झाली आहे. निकालामुळे 'कही खुशी, कही गम' अशीच परिस्थिती होती. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महासैनिक लॉनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. निकाल ऐकण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गावनिहाय निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांचे समर्थक फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त करत होते. 

पराभूत उमेदवार आणि त्यांचे समर्थक मात्र हिरमूस चेहऱ्याने मतमोजणी केंद्रातून निघून जाताना दिसत होते. तहसीलदार सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. 

नगर तालुक्यातील सरपंच पुढीलप्रमाणे
रांजणी - बाळासाहेब चेमटे, वाळकी - स्वाती बोठे, बाबुर्डी बेंद - अशोक रोकडे, पिपंपळगाव कौडा - सतीश ढवळे, साकत - जाईबाई केदारे, वडगाव तांदळी - कविता अनिल ठोंबरे, दहिगाव - मधुकर म्हस्के, आठवड - राजेंद्र मोरे, सारोळाबद्दी - सचिन लांडगे, मदडगाव - सुनीता शेडाळे, सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) - मोनिका चांदणे, आगडगाव - मच्छिंद्र कराळे, नांदगाव - सुनीता सरक, नेप्ती - सुधाकर कदम, शेंडी - सीताराम दाणी, कापुरवाडी - संभाजी भगत, टाकळी खातगाव - सुनील नरवडे, खातगाव टाकळी - संगीता कुलट, जखणगाव - सविता कर्डिले, सारोळा कासार - आरती कडूस, नागरदेवळे - सविता पानळकर, पांगरमल - बापूसाहेब आव्हाड, सारोळाबद्दी -सचिन लांडगे, राळेगण म्हसोबा - नीलेश साळवे, कौडगाव - धनंजय खर्से, नारायणडोहो - सविता गायकवाड, उक्कडगाव - नवनाथ म्हस्के.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.