श्रीगोंद्यातील देवदैठण येथे स्वयंघोषित महाराजाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे एका स्वयंघोषित महाराजाने ५३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, आरोपीवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संतोष नारायण बनकर (वय ३७) असे या महाराजाचे नाव आहे़


‘तू मला आवडतेस, मला तुझ्यावर प्रेम करु दे’

या बाबत अधिक माहिती अशी की काल गुरुवार (दि. ७) सायंकाळी पीडित महिला घरात एकटी होती़ ते पाहून महाराज म्हणून मिरवणा-या संतोष बनकर याने संबंधित महिलेच्या घरात घुसून ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यावर प्रेम करु दे’, असे म्हणत तिच्या अंगास लगट करु लागला़ त्यामुळे पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही आरडाओरड ऐकून शेतात गेलेली त्या महिलेची सून पळत घराकडे आली़ पळत येणा-या सुनेला पाहून बनकर याने तेथून पळ काढला होता.

झटापटीत पीडितेच्या हाताला जखमा 

या स्वयंघोषित महाराजा सोबत झालेल्या झटापटीत पीडितेच्या हातातील बांगड्या फुटल्याने हाताला जखमा झाल्या आहेत. याबाबत बेलवंडी पोलिसांनी आरोपी संतोष नारायण बनकर याच्याविरुद्ध कलम ३५४ व ४५२ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.