विज वितरण कंपनीच्या गलतथान कारभारामुळे शेतक-याला अपगंत्व.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्या लगतहून गेलेल्या कनोली एक्स्प्रेस विद्युत वाहिनीची तार ऊसाच्या शेतात तूटून झालेल्या अपघातात येथिल शिंदे वस्तीवरील रमेश लहानू शिदे (वय- ५५) हे विजेचा जोरदार धक्का बसून गंभीर जखमी झाले आहेत.
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रवरा उजव्या कालव्यालगत रमेश शिदे याची शेतजमिन व वस्ती आहे. गुरुवार रोजी नेहमीप्रमाणे सकाळी गायीचे दूध डेरीला घालण्याची तयारी करत असताना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोरील ऊसाच्या शेतात मोठा अवाज झाला. काय झाले हे बघण्यासाठी शिदे यानी तिकडे धाव घेतली. तर पाऊस व पाटपाण्याच्या पाझरामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तुटुन पडलेली विजेची तार त्याच्या नजरेस न पडल्याने शिंदे याना विजेचा जोरदार धक्का भसत ते जबर जखमी झाले. यात त्याचां कबरेपासून खालील पूर्ण भाग हा भाजला असून त्याना कायम स्वरुपी अपगंत्व येण्याची शक्यता निर्माण झाली असून शिदे याच्यांवर लोणी येथिल प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.

आश्वी खुर्द सबस्टेशनची कनोली ११ के. व्ही हि एक्स्प्रेस वाहिनी असून यावर आश्वी खुर्द येथिल ९, माळेवाडी येथिल १२, शेडगाव पूर्ण गाव, ओझर बुद्रुंकचा काही भागातील रोहित्रं आहेत. येथे प्रवरा उजवा कालवा व प्रवरानदी असून कमी-जादा दाबामुळे रोहित्रं जळने, तारा वितळणे व पोल पडणे आशा लहान-मोठया दुर्घटना नियमित घडत असतात.

दरम्यान मागील चार महिन्यापूर्वी याच वाहिनीवर शेडगाव येथे ठेकेदारीवर काम करनारा सुनिल क्षिरसागर काम करत असताना विजेचा धक्का बसून मृत्यूमुखी पडला होता. तर गुरुवारी पुन्हा शिदे याच्या बरोबर दूसरी मोठी घटना घडल्यामुळे विज वितरण कंपणीचा गलथान व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कित्येक वर्षापूर्वीच्या वाहिन्या, रोहित्रं व विद्युत उपकरणे नादुरुस्तं झाली असून त्याचाच फटका येथिल शेतकरी व नागरीकाना बसत आहे. तर आश्वी खुर्द येथिल नागरीकानी वारवार याबाबद तक्रार करुणही विज वितरण कंपनी कडून दखल घेतली जात नसल्यामुळे विज वितरण कंपनी विरोधात नागरीका कडून तीव्रं संताप व्यक्तं केला जात आहे.

आश्वी खुर्द येथिल शेतकरी रमेश शिदे याना विजेचा धक्का बसल्याची घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. दुर्घटनाग्रस्तं शेतक-याच्या कुटुंबाला कंपनी मार्फत अर्थिक व वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी आपन प्रयत्नं करु. - दत्तात्रय गोसावी, कार्यकारी अभियतां, संगमनेर.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.