शेवगावातील रोजरोसपणे मावा विक्री कोणाच्या पाठबळावर ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव शहरातील मावा कारखान्यावर छापा पडल्याच्या घटनेला आठ दिवस होऊन लोटल्यानंतर एक दिवसाचा अपवाद वगळता शेकडो माव्याच्या टप-या पुन्हा राजरोस सुरु झाल्या. अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या टप-या पुढील मावा घासणाच्या पथा-या थेट पुन्हा रस्त्यावर आल्याने त्यांना कोणाचे अभय मिळाले ? घातक कर्करोगाने अनेकांचा बळी घेणा-या माव्याची विक्री कोणाच्या पाठबळावर सुरू आहे, याबद्दल नागरिकांत जोरदार चर्चा सुरु झाली असून हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेवगाव येथील श्रीराम काँलनीतील माव्याच्या कारखान्यावर रविवारी ( दि. ३ ) संशयाच्या भोव-यात असलेल्या खाडाखोड केलेल्या क्रमांकाच्या वाहनातून आलेल्या एका पथकाने छापा टाकला. समोर लाखोचा अक्षेपार्ह मुद्देमाल असतांना त्याचा ना पंचनामा झाला ना तो जप्त झाला.

 स्थानिक पुढा-याच्या मध्यस्थितीने मोठी तडजोड करुन हे पथक गायब झाले. त्याचा येथे मोठा बोभाटा झाला. माध्यमांनी त्या घटनेची यथायोग्य दखल घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासन जागे झाले. आता याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना दिले आहेत. 

स्थानिक नागरीक त्याबद्दलही नाराजी व्यक्त करीत आहेत. माव्याच्या टप-या पुन्हा कशा सुरु झाल्या या संदर्भात पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते आमच्या कार्यकक्षेत येत नाही. अन्न व औषध प्रशासनाने ती कारवाई करणे अपेक्षित असून त्यांना आवश्यक असल्यास आम्ही मदत देवू शकतो असा खुलासा केला. जिल्हयातील अन्न व औषध प्रसासन विभागाने मात्र या प्रकारात सध्या झोपेचे सोंग घेतल्याचे दिसते. 

या विभागाचे लोक फक्त महिना अखेरीस येथे फेरफटका मारतांना आढळतात. तो फेरफटका कशासाठी हेही सर्वश्रुत आहे. या विभागाची तसेच रविवारी झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता येथील विविध संघटनांनी लावून धरली आहे. 

माव्याने व आमली पदार्थाने होणा-या प्रचंड दुष्परिणाने येथील तरुण पिढी बरबाद होत आहे. याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल. मावा कारखान्याचे मालक, दुकानदार , अन्न व भेसळ तसेच पोलीस प्रशासन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रोजरोसपणे सुरू मावा विक्रीची दुकाने 
गुटख्यावर शासनाने बंदी घातल्यानंतर दहा ते बारा वर्षांत शेवगाव शहरात मावा विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला. घातक रसायने व सुगंधी तंबाखू असलेल्या मिस्रणाच्या माव्याच्या सेवनाची चटक लागून शहरातील तीन ते चार जणांना प्राणास मुकावे लागले आहे. अनेक जणांना तोंडाचा कर्करोग झाला असून त्यांच्यावर नित्यसेवा रूग्णानयात उपचार सरू आहेत. असे असताना शरिरास हानीकारक माव्याची विक्री राजरोसपणे कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.