जामखेडमध्ये शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्‍यातील धोंडपारगाव येथील शेतमजूर मारूती माधव शिंदे (वय 60) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मारूती शिंदे धोंडपारगाव येथे राहत होते. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मंगळवारी सकाळी देवदर्शन घेऊन शेतातील उडीद काढण्यासाठी जातो असे सांगून तेघरातून गेले. त्यानंतर शेतातील पत्र्याच्या शेडच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेआढळून आले. त्यांचा पुतण्या शेतात गेला असता हा प्रकार दिसला. पोलीस पाटील रामचंद्र शिंदे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

मयत शिंदे यांची पत्नी सखुबाई यांच्यावर दोन वेळा बायपास सर्जरी करण्यात आली. शिंदे यांना शेतजमीन विकावी लागली होती. शिंदे यांचा मुलगा नोकरीनिमित्त पुणे येथे काही महिन्यांपूर्वी गेला होता. परंतु तेथे कंपनीत काम करताना अपघात होऊन त्याला उजवा हात गमवावा लागला. तोही सध्या घरी बसून आहे. 

यामुळे मारुती शिंदे निराश झाले होते. या कारणातूनच त्यांनी जीवनयात्रा संपवली असावी, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यांच्या मागेपत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, सून, मुलगी असा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.