शिर्डीतील सामाजिक कार्याचा चला हवा येवू द्या कार्यक्रमात गौरव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदार संघात राबविल्या जाणाऱ्या सामाजिक योजनांचा गौरव झी मराठी या वृत्तवाहीनीवर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या चला हवा येवू द्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर झाला.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साईबाबांच्या विचारांचा संदेश लोकांपर्यंत जावा या उद्देशाने प्रवरानगरच्या डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचे आयोजन झी मराठी या वृत्तवाहिनीने केले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि मुख्य कलाकार डॉ. निलेश साबळे यांनी सहकाराच्या या भूमीत सांस्कृतिक व्यासपीठावरून विखे पाटील परिवाराच्या सामाजिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून शेतकरी, महीला यांच्‍याकरीता राबविण्‍यात येणा-या सामाजिक उपक्रमांचा आवर्जुन उल्‍लेख या कार्यक्रमात केला आणि जनसेवा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडूनही या योजनांची माहीती त्‍यांनी जाणून घेतली.

माजी मंत्री आण्णसाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील, यांच्यासह विविध संस्थांचे संचालक अधिकारी आणि कामगाराना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तसेच चला हवा येवू द्या या कार्यक्रमातील नावलौकिक प्राप्त झालेले सर्व कलाकार या प्रसंगी उपस्थित होते.

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचा प्रामुख्याने या व्यासपीठावरून उल्लेख करतानाच प्रवरेच्या या भूमीत विखे पाटील परिवाराने सामाजिक बांधीलकीतून लोकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा गौरवही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. निलेश साबळे यांनी जनसेवा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून जलक्रांती अभियान, मोफत अपघात विमा योजना, महीला बचत गटांची चळवळ या संदर्भात माहीती घेतली.

नगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील शेतकरी कुटुंब सहाय्य योजनेची सुरू असलेल्या अमलबजावणीची माहिती यावेळी डाॅ. सुजय विखे यांनी दिली. झी मराठी परिवाराच्या वतीने डॉ.सुजय विखे पाटील आणि सौ.धनश्रीताई विखे पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.