पंचवीस वर्षाचा अंधकार लोटण्यासाठी विकासात्मक दिशेने वाटचाल - आ.संग्राम जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काम करण्याची मानसिकता असावी लागते. नियोजना अभावी महापालिकेत निधी उपलब्ध नाही. महापालिकेत शुन्य नियोजन कारभार चालू असून, नागरिकांना वेठीस धरले जात आहे. शहराची प्रतिमा खराब करण्याचे काम सत्ताधारी करत असून, शहरात कोणी किती दिवे लावले हे सर्वश्रृत आहे. पंचवीस वर्षाचा अंधकार लोटण्यासाठी विकासात्मक दिशेने वाटचाल चालू असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


प्रभाग क्र.19 जीपीओ रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या चौकात हायमॅक्सचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, मुजाहिद (भा) कुरेशी, बाबासाहेब गाडळकर, नगरसेवक विपुल शेटीया, भुपेंद्र परदेशी, दिलदारसिंग बीर, अभिजीत खोसे, एजाज कुरेशी, साजिद शेख, सोफियान शेख, वसिम शेख, अजहर खान, तौसिफ कुरेशी, इमरान शेख, सालिम शेख, नसिर कुरेशी आदिंसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातून नागरिक येत असतात. हा परिसर स्वच्छ व सुंदर राहणे अपेक्षित आहे. मात्र येथील ड्रेनेज लाईन व रस्त्याच्या कामाला मंजुरीचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी आठ महिने लावले. या प्रश्‍नावर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत घाई घाईने गुरुवार दि.14 सप्टेंबरला होणार्‍या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या रस्त्याचा विषय घेण्यात आला आहे. 

या रस्त्याचा मंजुरीचा निर्णय घेवून, लगेचच जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. मात्र जाणीवपुर्वक प्रस्ताव न पाठवता नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केले. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यास पाठपुरावा करुन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसर सुंदर होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.