जिपच्या शाळा खोल्या दुरूस्तीसाठी ८१ कोटींच्या निधीची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषदेच्या शाळेच्या १०६३ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८१ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय विकास परिषदेत ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, विषय समित्यांचे सभापती अजय फटांगरे, उमेश परहर, अनुराधाताई नागवडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. व याबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे हे उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेत दि.७ व ८ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय विकास परिषद पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या होत्या.तर परिषदेच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व प्रशासन संसदीय मंत्री गिरीष बापट,राज्यमंत्री ग्रामविकास विभाग दादासाहेब भुसे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ग्रामविकास व पंचायत राज सचिव आसिम गुप्ता तसेच राज्यभरातून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष विषय समितीचे सर्व सभापती या परिषदेसाठी उपस्थित होते. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.