स्वाईन फ्लूने पारनेरमध्ये एकाचा मृत्यू .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी असलेले व बप्पा नावाने परिचित असलेले बाळासाहेब सूर्यकांत भालेराव वय ५२ यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या निमित्त पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. तर पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लू सदृश रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कोमात गेली आहे. याबाबत कोणतीही उपाययोजना अथवा जनजागृती करताना आरोग्य विभाग दिसून येत नाही. त्यामुळे या आरोग्य विभागाचेच ऑपरेशन करण्याची गरज आहे.

यापूर्वी वडगाव सावताळ येथील सिंधूबाई खरमाळे, वासुंदे येथील पंढरीनाथ झावरे व गेल्या महिन्यात टाकळी ढोकेश्वर येथील बबन गांधी यांचा स्वाईन फ्लुने पुणे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अनेक रुग्ण टाकळी ढोकेश्वर व परिसरात आढळून आले आहेत. सध्याही अनेक रूग्ण नगर व पुणे याठिकाणी खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

पारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेकजन साथींच्या आजाराने त्रस्त झाली आहे. या साथीच्या आजाराने अनेक रूग्ण तापाने फणफणले असून डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे नागरिक साथ रोगाने त्रस्त असताना आरोग्य यंत्रणा मात्र गप्प का ? या बाबत कायम संभ्रम आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.