अवैध वाळू उपसा करणारे ३ ट्रक ताब्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाळू लिलावाच्या साठ्यामधून दिलेल्या पावत्यावर खाडाखोड करून तारीख व वेळ यांच्यात बदल करून शासनाची फसवणूक करून १२ ब्रास वाळूची चोरी केल्याप्रकरणी ३ ट्रकसह जवळपास १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. ६) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास विळद घाटाजवळील निंबळक बायपास रोडवर ही कारवाई केली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची माहिती अशी की, वाळूचे तीन ढंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. हिंगोले, पोहेकॉ.मन्सूर सय्यद, पोना. मनोज गोसावी, पोना.दत्ता गव्हाणे, पोना.विजय ठोंबरे, पोकॉ. रवींद्र कर्डिले, पोकॉ.सचिन आडबल, पोना.भोपळे यांच्या पथकाने तीन वाळूचे ढंपर ताब्यात घेतले असून

याप्रकरणी भाऊसाहेब बाबासाहेब पवार (रा. गवळीवाडा), सोमनाथ मोहन निकम (रा.विळद, नगर), संतोष धोंडीराम लष्करे (रा.देहरे, नगर), संजय तांबे, कारभारी पोटे, कैलास अडसुरे, नारायण बाबासाहेब नरवडे (रा.तिसगाव) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोना.ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.