श्रीगोंद्यात जुगार अड्डयावर छापा २८ हजारांचा मुद्देमाल जप्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांसह जुगार खेळणाऱ्यांवर देखील कारवाई केली. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या आरोपी ज्ञानेशवर मारुती वाघोली, बापू बाबू माने, तन्वीर रियाज शेख, सतीश रघुनाथ लाढाणे, राणा सोपान खेतमाळीस,पांडुरंग कोंडीबा जाधव, स्वप्नील राजू खेत्रे सर्व रा.श्रीगोंदा यांना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडले असून. त्यांच्याकडून २८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जुगारबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.