संगमनेर तालुक्यात दोन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर  तालुक्याच्या पठार भागावर असणाऱ्या पोखरी बाळेश्वर येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरात मुलगा व मुलीची दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही नायलॉनच्या दोरीने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी ५.३० ते गुरुवारी (दि.७) सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. या हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने तालुक्यासह नगर जिल्हाही हादरला. अस्मिता (वय ११) व प्रफुल्ल अशोक फटांगरे (वय ७) अशी हत्या झालेल्या मुलांची, तर अशोक संतू फटांगरे (वय ३५) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे..

कालपर्यंत आई-आई म्हणणारी मुलं दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत पाहून 'बाळांनो झोपेतून उठा.. तुम्हाला काय झाले, माझ्याशी एकदा तरी बोला' असे म्हणत या मातेने अक्षरश: टाहो फोडला. त्यामुळे घटनास्थळावर असणाऱ्या सर्वांचे हृदय हेलावून गेले होते..

रस्त्याअभावी मृतदेहांची अवहेलना.
पोखरी बाळेश्वर येथील सोंडवस्ती याठिकाणी जाण्यासाठी चांगला पायी रस्ताही नाही. त्यामुळे या ठिकाणाहून रस्त्यापर्यंत मृतदेह कसे आणायचे असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला होता. पण ग्रामस्थांनी झोळी करत हे तिन्ही मृतदेह दरीतून छोट्या असणाऱ्या पाऊलवाटेने रस्त्यापर्यंत आणले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.