जिल्हा बॅँकेकडून ४ हजार ५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या जिल्हा सहकारी बॅँकेने २०१६-१७ आर्थिक वर्षात अल्प, मध्यम, दीर्घ व वैयक्तीक अशा स्वरुपातील तब्बल ४०५०.१७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. बॅँकेस ३३.२० कोटी रुपयांचा नफा झाला असून बॅँकेचे खेळते भांडवल ५,३५७.१५ कोटीच्या घरात गेले आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

बॅँकेच्या आर्थिक विकासाचा दर २०१५-१६ च्या तुलनेने २०१६-१७ मध्ये वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॅँकेची ६० वी सर्वसाधारण वार्षिक सभा चेअरमन सिताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ८) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री. गायकर यांनी बॅँकेच्या आर्थिक उलाढालीची सविस्तर माहिती सभासदांना नमूद केली.

सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. श्री. गायकर यांनी बॅँकेच्या विकासाचा आढावा सादर करताना अनेक मुद्दे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बॅँकेने १७१७.४३ कोटी रुपयांचे अल्मुदतीतील कर्ज वाटप केले असून ३१ मार्च २०१७ अखेर १६७४.२४ कोटी इतके येणे बाकी आहे. 

शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतीसाठी पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटार, ठिबक सिंचन, शेती अवजारे, डेअरी डेव्हलपमेंट आदींसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी बॅँकेचे ६९८.७५ कोटी स्व भांडवल होते. त्यात वाढ होऊन ते आता ७३९.८९ कोटी इतके झाले आहे. 

मागच्या वर्षी ५१२१.६६ कोटी ठेवी होत्या. त्यात वाढ होऊन ५२४८.३९ कोटी झाल्या आहेत. बॅँकेची गुंतवणूक २४८३.१९ कोटी इतकी झाली आहे. संचालक मंडळाने भाग धारकांना ९ टक्के प्रमाणे सुमारे १८.२९ कोटी लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. बॅँकेस अ ऑडीट वर्ग मिळाला आहे. बॅँकेच्या २८६ शाखा असून ग्राहकांसाठी एटीएम सेवाही सुरु करण्यात आली आहे. .

टाळ्या वाजवायला सांगावे लागते.
बॅँकेचे जेष्ठ संचालक पांडुरंग अभंग यांनी ऐनवेळचा विषय मांडला. जिल्ह्यातील गट सचिवांना ग्रॅज्युएटी देण्यासाठी १ कोटी ११ लाख रुपये मंजूर करण्याचा विषय त्यांनी मांडला, त्यास सभासदांनी मंजूरी दिली. इतर विषयाला मंजूरी देताना सभासदांनी टाळ्या वाजवायला नाही. हा धागा पकडत आता तरी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायला सांगावे लागते असे अभंग यांनी नमूद करताच एकच हास्यकल्लोळ झाला. 

कर्जमाफीवरुन ससाणेंचा राज्य सरकारला टोला .
कॉँग्रेसचे जेष्ठ नेते तथा बॅँकेचे संचालक माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी अगदी मोजक्याच शब्दात कर्जमाफीवरुन राज्य सरकारला टोला लगावला. राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीची त्यांनी एक प्रकारे खिल्लीच उडवली. शेतकऱ्यांचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे असे नमूद करत राज्य सरकारने आता बॅँकेंच्या नफ्यातील २० टक्के रक्कम घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. हा चुकीचा निर्णय रद्द करण्यासाठी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्याच्यावतीने पुढाकार घ्यावा अशी सूचना ससाणेंनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.