शेतकरी संघाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील- बिपीन कोल्हे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेली आठ दशके नफा कमविण्याचा उद्देश न ठेवता सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या शेतकरी संघाला स्पर्धेला तोंड देण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधावे लागतील, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोल्हे बोलत होते. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

माजीमंत्री शंकरराव कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनीचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, संचालक आप्पासाहेब दवंगे, अंबादास देवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, साई संजीवनी बॅँकेचे सरव्यवस्थापक पद्माकर सभारंजक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष वाल्मिक भास्कर यांनी प्रास्ताविक केले. 

उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.