नगराध्यक्ष तनपुरे यांची गांधीगिरी बुजवला स्वत: महामार्गावरील खड्डा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे नगर-मनमाड महामार्गावरील एका दुकानच्या उद्घाटनासाठी निघालले असताना हॉटेल भाग्यश्री समोर रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात एक दुजाकीवरील जोडपे अपघातातून बालंबाल बचावले. हे दृश्य पाहाताच नगराध्यक्ष तनपुरे यांनी सदरचा खड्डा स्वत: बुजवत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार कंपनिच्या बेजबाबदारपणाच्या कामाविराधात अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत अधिक माहीती अशी की, सोमवारी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे एका दुकानाच्या उद्घाटनासाठी नगर-मनमाड महामार्गावरून चाचले होते. हॉटेल भाग्यश्रीसमोर ते आले असता मनमाडकडून मोटरसायकल वरुन एक जोडपे राहुरीकडे जात होते.

 महामार्गावरील एक मोठा खड्डा चुकविण्याच्या नादात हे जोडपे अपघातातुन बालंबाल बचावले. हे दृश्य पहाताना नगराध्यक्षांसह उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. कार्यक्रमाकडे जाणे सोडत नगराध्यक्ष तसेच छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, अनिल इंगळे, आदिनाथ तनपुरे, राजू गुंजाळ, बाबासाहेब भवर आदि कार्यकर्त्यांनी तत्काळ हा खड्डा बुजवुन अनोखे गांधीगिरी आंदोलन केले.

गेल्या महिन्याभरात महामार्गावरील खड्यांमुळे राहुरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.गेल्या काही दिवसांपासून नगर-मनमाड महामार्गावर जागोजागी मोठ मोठाले खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. 

आठच दिवसांपूर्वी शहरातील एक युवक हृषिकेश खैरनार याचा मृत्यू अशाच एका मोठ्या खड्यामुळे झाल्याची घटना ताजी आहे. असे अपघात होण्याची मालिका सुरु असतानाही हे खड्डे बुजविण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ज्यांच्याकडे रस्त्याच्या कामाची जबाबदारी आहे, त्या सुप्रीम कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. आरङाओरड झाली की थातुरमातुर रस्त्याची डागडुजी केली जाते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.