कर्जतमध्ये बोगस डॉक्टर पकडला, पण कारवाईचा अधिकार नसल्याने सोडून दिला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील राशीन येथे डॉ.एन.पी. बनीक नावाने गेल्या अनेक महिन्यांपासून विविध आजारांवर एकच औषध देणाऱ्या बोगस डॉक्टरला मंगळवारी ग्रामस्थांनी पकडून पोसिलांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, असे सांगत पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास नकार दिला. शेवटी ग्रामपंचायत स्तरावर पुन्हा अशी बोगस प्रॅक्टीस करणार नाही, असे लेखी घेऊन त्याला सोडून देण्यात आले. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पश्चिम बंगाल येथील डॉ.बनीक हा कोणतीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसताना राशीन येथे विविध आजारावर एकच औषध देत होता. ज्या गोळ्या तो देत होता, त्यामुळे भविष्यात किडण्या खराब होणे, पोटाचे विविध आजार होणे असे अपाय होणार होते. ही बाब लक्षात आल्यावर याबाबत मेडिकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनायक जगताप, डॉ.शिवाजी काळे, डॉ.मंगेश रेणूकर यांनी ग्रामपंचायत व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कारवाई न झाल्याने मंगळवारी गणेश कदम, स्वप्नील मोढळे यांच्यासह ग्रामस्थांनी त्या डॉक्टरला पकडून राशीन पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंदे यांना कल्पना देण्यात आली. मात्र पोलिस चौकीवर गेल्यावर यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक असते, त्या पथकाने छापा टाकून जर असे डॉक्टर पकडले. तरच त्यांच्यावर कारवाई करता येते असे ग्रामस्थांना पोलिस उपनिरीक्षक वैभव महांगरे यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचा नाईलाज झाला.

शेवटी ग्रामपंचायत स्तरावर त्या डॉक्टरकडून पुन्हा अशी बोगस प्रॅक्टीस करणार नाही, लोकांच्या आरोग्याला घातक अशा गोळ्या देणार नाही, असे लेखी घेऊन त्या डॉक्टरला सोडून देण्यात आले. यावेळी विशाल देशमुख, सदस्य दत्तात्रय गोसावी, स्वप्नील मोढळे, भीमराव साळवे, उपसरपंच साहेबराव साळवे, गणेश कदम, दीपक थोरात आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.