मारहाणीच्या निषेधार्थ श्रीरामपूर पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन करत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निलंबनाची मागणी केली. तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर उद्या जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेण्याचे ठरल्याने उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

गणेश विसर्जन मिरवणुकीत काल पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मंडळ सहभागी झाले होते. विर्सजन मिरवणूक सुरू होताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पालिकेच्या साऊंड सिस्टीमवर कारवाई केली. त्यानंतर आ. भाऊसाहेब कांबळे व नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी मध्यस्थी केल्यानंतर साऊंड सिस्टीम पुन्हा मिरवणुकीत सहभागी झाली.

त्यानंतर मिरवणूक शिवाजी रोड मार्गे, मेन रोडने आझाद मैदानासमोर आली असता पोलिसांनी पुन्हा कारवाई करत साऊंड सिस्टीम जप्त केली. यावेळी दीपक धनसिंग, योगेश शेलार या दोन पालिका कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली. 

त्यानंतर त्यांना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. या घटनेच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज कामबंद आंदोलन केले. यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले.

प्रारंभी पालिकेसमोर व नंतर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह सर्वपक्षियांनी यांस पाठिंबा दर्शविला. 

तहसीलदार सुभाष दळवी, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप यांनी पालिकेत भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, त्यावर कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे कामगारांनी मेनरोडने तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. याठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. 

यात आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक राजेंद्र पवार, रवींद्र गुलाटी, प्रकाश ढोकणे, प्रणिती चव्हाण, सुभाष गांगड, रमेश अपील, संजय शेळके, श्यामलिंग शिंदे, सचिन बडदे, केतन खोरे, सचिन ब्राह्मणे आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक दिलीप नागरे, किरण लुणिया, ॲड. संतोष कांबळे, करीम कुरेशी, मुक्तार शाह, दीपक चव्हाण, अल्तमश पटेल, संजय गांगड, अशोक बागूल, के. सी. शेळके, रईस जहागीरदार, मुख्याधिकारी सुमंत मोरे आदी उपस्थित होते. .

तहसीलदारांच्या दालनात सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप यांच्याकडे शहर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी आ. कांबळे, नगराध्यक्षा आदिक, नगरसेवक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. 

पवार यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, याचवेळी त्यांनी पालिकेच्या साऊंड सिस्टीमचा आवाज १०० डेसीबलपेक्षाही अधिक असल्याचा पुरावा असल्याचे सांगितल्याने सर्वांनीच आक्रमक भूमिका घेत शिंदे यांच्या वर्तणूकीचा निषेध करत कारवाईची मागणी केली.

त्यानंतर पवार यांनी तहसीलदारांच्या ॲन्टीचेंबरमध्ये आ. कांबळे, नगराध्यक्ष आदिक, नगरसेवक गुलाटी, तहसीलदार व उपअधीक्षकांसमवेत चर्चा केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना संबोधित करत झालेल्या घटनेची वरिष्ठांमार्फत चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, कर्मचाऱ्यांचे यावर समाधान न झाल्याने ते आंदोलनावर ठाम रहिले. त्यानंतर नगराध्यक्ष आदिक यांनी मध्यस्थी करत उद्या (दि. ७) जिल्हा पोलीस प्रमुख यांची शिष्टमंडळासह भेट घेत शिंदे यांच्यावर कारवाईसंदर्भात मागणी करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आंदोलन कायम ठेवत कर्मचारी याठिकाणाहून निघून गेले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.